पोटाचा घेर एक समस्या
आज जर कोणती समस्या असेल तर ती म्हणजे पोटाचा वाढलेला घेर .हे वाचण्यापूर्वी आपल्या पोटाचा घेर बघा .असेल तर काही तरी उपाय करा व नसेल तर तुम्ही भाग्यवान.100 लोकांमध्ये जवळजवळ 90% लोकांचा पोटाचा घेर वाढलेला दिसतो पोटाच्या घेरमुळेच बर्याच शरीराच्या तक्रारी चालू होतात . पोटाच्या घेरमुळे पाठीच्या मणक्यावर ताण येतो व मणक्याचे आजार डोकं वर काढू लागतात .एकतर चालताना त्रास होतो पळता येत नाही थोडे चालले की लगेच दम लागतो काही कामं केले की थकायला होते . पोटाच्या घेरमुळे व्यवस्थित बसता येत नाही तसेच योगासने करता येत नाही बसताना त्रास होतो जास्त बसू शकत नाही की जास्त उभे राहू शकत नाही . मांडी घालून बसता येत नाही झोपतांना त्रास होतो .पोटावर कधीच झोपू शकत नाही .पोट वाढले त्याला भरण्यासाठी तेवढे खायला लागते त्यामुळे वजन control मध्ये येत नाही शरीर बेढब दिसायला लागते पुरूष किंवा स्री कितीही सुंदर असली तरी पोटाच्या घेरमुळे सुंदरता लयाला जाते .कपडे घातले की व्यवस्थित बसत नाही त्या घेरमुळे शर्टिंग जरी केली तरी विचित्र दिसतो व नाही केली तरी पुढून तो शर्ट वरती आलेला दिसतो .पचनाच्या तक्रारी चालू होतात अनेक पोटाचे विकार सुरू होतात त्या घेरमुळे वजन वाढते व त्याचा ताण गुडघ्यांवर पडतो त्यामुळे गुडघे दुखतात .त्या घेरमुळे ऐन तारूण्यात तुम्ही वयस्कर दिसायला लागतात म्हणून ज्यांचा पोटाचा घेर खूप जास्त आहे त्यांनी इतर काही कमवण्यापेक्षा तो घेर कसा कमी होईल याचा विचार करावा .खाणे पिणे तसेच चालणे प्राणायाम पोटाचा व्यायाम यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवता येते. ज्यादिवशी तुमचा तो वाढलेला घेर कमी होईल त्यादिवसापासून एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल व जगायला उत्साह वाटेल. त्यावेळी तुम्हांला चालायला खूप आवडेल तसेच धावायलाही आवडेल काम कितीही केले तरी थकवा जाणवणार नाही . तरूण झाल्यासारखे वाटेल .त्यादिवशी तुम्ही सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणार कारण तो वाढवणे खूप सोपे असते पण कमी करणे फार अवघड पण अशक्य मात्र नसते. मी अनुभवाने सांगतो आहे तुम्हीही अनुभव घेऊन बघा व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment