आडी जागरण श्रद्धा की अंधश्रद्धा
बर्याच गावात आडी जागरण करण्याची पद्धत आहे .अनेक लोकांच्या अंगात येते असे म्हणतात मग कुणाच्या अंगात खंडोबा येतो कुणाच्या अंगात वेताळ येतो कुणाच्या अंगात देवी येते .रात्रंभर खंडोबाच्या नावाने भजन नामघोष करतात व एक आडी खोदतात मग ती कधी 11हाताची कधी 21 तर कधी 51 हाताची खोदतात तेथे जाड लाकडे टाकून पेटवतात व पूर्ण आडी गरम कोळशाने भरली जाते मग प्रत्येक अंगात येणारे लोकं आडीला वाजत गाजत नमस्कार करतात व भंडार त्यात टाकतात व तांबडे फुटायच्या आधी त्यात अनवाणी चालतात .मला प्रश्न पडतो की त्या आडीत जेव्हा उतरतात तेव्हा त्यात पापणी हलण्याच्या आधी क्राॅस करतात जर अंगात खरंच कुणी येत असेल तर मग त्या आडीत हळूहळू चाला व तसे करूनही पाय भाजले नाहित मग समजावे की काहीतरी शक्तीमुळे असे घडते पण आडीत पळत गेल्याने संशयाला जागा उरते .खरं काय व खोटे काय हे सांगता येणे अवघड आहे पण नक्की काहीतरी आहे त्याशिवाय एवढा मोठा उत्सव करणे शक्य नाही पण सत्य समजण्यासाठी तेवढा लख्ख प्रकाश असायला हवा पण सगळ्यांच्या मनात एकच विचार येतो की श्रद्धा की अंधश्रद्धा.बर जे अंगात येते त्यात किती शिक्षक किती डाॅक्टर किती इंजिनिअर कितीमोठे उद्योगपती किती श्रीमंत लोक आहेत उत्तर म्हणजे वरील लोक त्यात नाहीतच. एखादा दुसरा असू शकतो मग अशा मोठ्या लोकांच्या अंगात का नाही येत कुणी देवदेवता ? याचे उत्तर कुणाकडे असेल? असेल उत्तर तर पाठवा .बघा विचार करा .मी पण त्या सत्यांच्या शोधात आहे
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment