काय करतात मुलं
कितीही पैसा कमवला
तो नाही कुणी विचारत
विचारतात सगळे एकच प्रश्न
मुलं काय करतात
जमीनजुमला पैसे भरपूर केले
जीवनभर गोळा
मुलांवर नसेल चांगले संस्कार
तेव्हा आयुष्यावर फिरतो बोळा
आपली प्रतिष्ठा वाढवतात
आपली मूले
आणि धुळीलाही मिळवतात
काही मुले
पैशापेक्षा खरी संपती असते
मुले संस्कारी
पैसे कमवण्या बरोबरच
लक्ष असावे मुलांवरी
मुलांबरोबर प्रेमाने तर
कधी कठोरही बनावे
शिस्त लावावी त्यांना
त्याआधी आपल्यात गुण असावे
मुलांबरोबर मैत्रीही कधीतरी
छान करावी
त्यांची घुसमट आपण
कळून घ्यावी
जे मागेल ते पुरवू नये
कायम मुलांना
नाही मिळणार हे ही
सांगावे कधीतरी ठणकावून त्यांना
चटके सहन करायची
असावी तयारी त्यांची
आयुष्यांच्या बिकट समयी
आहे तयारी ती कामाची
मुले असतात संसाराच्या
वेलीवरचे फुले
भविष्यांसाठी होतात त्यांचीच
मधुर फळे
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment