सकारात्मक विचार
सकाळी एकाला जाग येते व आल्यावर चिंता करतो हे काम करायचे ते करायचे व काल हे झाले नाही ते झाले नाही त्यामुळे मनात गोंधळ सुरू झाला व दुसर्या व्यक्तीला जेव्हा जाग येते तेव्हा परमेश्वराचे आभार मानतो की मी जीवंत आहे कारण हजारो लोक झोपेत रोज मरत असतात व मी त्यांच्यात नाही त्यामुळे देवाचे आभार मानतो व आनंदी होतो. काल जे झाले त्याची चिंता नाही करत .आज काय करायचे याचा विचार करून कामाला लागतो व सर्व कामं व्यवस्थित होतात कारण सकारात्मक विचार घेऊनच सुरवात झाली तर दिवसही छान जातो .बायको कजाक असली तर देवाकडे माणूस ओढला जातो व चांगली सहकार्य देणारी असली तर चांगल्या कामात ती मैत्रिण होते व ते कामं तडीस नेता येते .सकारात्मक मुळे जे आपल्याला दिसते ते नकारात्मक वाल्यांना नाही दिसत.एकदा श्रीकृष्ण आपल्या मित्रांबरोबर जात होता तेव्हा रोडवर एक कुत्रा मरणाअवस्थेत पडलेला होता त्याचे तोंड उघडे होते व दात दिसत होते बाहेर जीभ काढून पडलेला होता दुर्गंधी येत होती सर्वजण नाकाला दाबून पळत निघाले पण कृष्ण त्याच्याजवळ उभा राहून हसत होता मित्रांना नवल वाटले कृष्ण म्हणतो तुम्ही फक्त दुर्गंधी बघितली पण सूर्यप्रकाशात चमकणारे त्याचे दात बघा किती पांढरे शुभ्र आहेत व ते दात बघुन मला अतिशय आनंद झाला व तो आनंद पुन्हा पुन्हा मिळण्यासाठी मी उभा आहे हे ऐकून सारे मित्र आवाक झालेत म्हणजे वाईट मधून चांगले बघण्याचा जेव्हा दृष्टिकोन निर्माण होईल तेव्हा सुखात व दु:खात माणूस सम असणार व कायम आनंदात असणार सकारात्मक विचार जीवन आनंदी करून सोडतात व जगायला प्रेरणा देतात .बघू या आपल्याला जमतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment