Skip to main content

मी पाहिलेला गणपती

मी पाहिलेला गणपती

आपण बरेचजण गणपती दर्शनाला जातो काही ठिकाणी गर्दी असते पाय ठेवायला जागा नसते तेथील लोक हाताला धरुन  बाहेर लोटतात गणपतीचे दर्शनही घेऊ देत नाही रांगेत तासनतास उभे राहायचे व व्यवस्थित दर्शन न घेताच बाहेर पडायचे त्यामुळे मनाला शांती तरी मिळते का ?मग दहा दिवसानंतर किती पैसे व सोने जमा झाले याचा हिशोब लावत बसायचा असा सर्व व्यवहार झाला आहे लोक दान टाकतात मग त्यांना देवापुढे नतमस्तक व्हायची संधी तर द्यायला हवी पण गर्दीमुळे ती ही संधी मिळत नाही .मी मिसेसच्या मामाकडे गणपतीला गेलो .दर्शन घेतले पण मागायचे विसरून गेलो पण त्याला माहीत असते की व्यक्ती कोणत्या दु:खातून जात आहे  .दर्शन झाले व गावाकडे आलो पण माझ्या दु:खावर काय करता येईल ते आधीच त्याने ठरवून ठेवले होते पाठदुखीचा त्रास होत होता मग लखूभाई चौर्या नावाच्या रूपाने गणेश बाप्पा प्रत्यक्षात हजर झाला व त्याने मला बोलावून घेतले व उपचार केले त्यामुळे त्याच्या रूपात मला गणेशाचे दर्शन झाले व विघ्नहर्ता हे बिरूद त्याने सार्थ केले तो कोणत्याही रूपात येतो मग लालबाग राजाला जायला पाहिजे असे नाही श्रध्दा असेल तर तो सगळीकडे आहे व दु:खाचे निवारण करतो म्हणून मोठ्या गणपतीला हजारो लाखो वाहिले तरचं फळ देणार असे नाही .तो काय  गरीब वाटला काय .सृष्टीचा रचनाकार आहे तो .कुबेर व लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरतात तो तुमच्या पैशाचा लोभी नाही तो लोभी आहे तुमच्या भक्तीचा .खरी भक्ती त्याला आवडते व त्या बदल्यात भरपूर देऊन टाकतो.आपल्या कर्माला यश देतो पण कर्म सत्कर्म असेल तर त्यामुळे ठायीच बैसोनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा गणपती बाप्पा मोरया !
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...