शहरातील बाग
सकाळी चार वाजेपासून माणसांची लगबग चालू होते बागेत जाण्यासाठी कुणी चालणे याला महत्व देतात तर कुणी रनिंग करतात कुणी गवतावर चालतात तर कुणी अनवाणी बागेत फेर्या मारतात कुणी रामदेव बाबासारखा प्राणायाम करतात तर कुणी योगा करतांना दिसतात .जेष्ठ नागरीकांचे हक्काचे ठिकाण असते मन मोकळे करण्यासाठी तसेच त्यांचा ग्रूप जमतो व एकत्रित हास्याचे कारंजे फुटतांना दिसतात शहरातील असे बगिचे म्हणजे आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत लोकांचा सगळा थकवा निघून जातो .अनेक लोकांचे वजनं ह्रा बागमुळेच कमी झालैत तसेच अनेक मानसिक शारिरीक व्याधी कमी झाल्यात लोकांच्या. म्हणून दिवसेंदिवस तेथे गर्दी दिसते . त्या ठिकाणी अनेक मित्र जोडले जातात काही ठिकाणी लग्नाच्या जोडीदाराचीही ओळख होते .निवांत सकाळ संध्याकाळ जेष्ठांसाठी अशा बागा म्हणजे वेळ छान घालवण्याचे ठिकाण काहीजण डोळे मिटून शांत बसलेले दिसतात अशा उद्यानात काही तरूण तरूणीचे प्रेमाचे चाळे करतांना दिसतात त्यामुळे अशा वेळी लोकांनी विरोध करून असले प्रकार अशा पवित्र ठिकाणी थांबवले पाहिजेत व अशा उद्यानांचा खरा उपयोग करून घ्यायला हवा व तेथील स्वच्छता व पावित्र जपले पाहिजे तेव्हा नक्कीच तेथे आनंद मिळेल म्हणून शहरात अशी उद्याने असायलाच हवीत त्यामुळे आरोग्य लोकांचे छान राहील व काम करायला हूरूप येईल. सगळ्या वयोगटांसाठी अशी उद्याने उपयोगी आहेत आणि लोकांना अशा उद्यानांचे महत्व कळायला लागले म्हणून तुम्ही जात असलात तर चांगले आहे व नसेल जात तर जाऊन बघा जीवन बदलून जाईल व मरगळ निघून जाईल .बघा जमतं का जायला.
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment