Skip to main content

पालकांचा प्रश्न

पालकांना पडलेला प्रश्न

इंजिनिअरनिंगला जाऊ की
मेडीकलला जाऊ
काहीच नाही समजतं
वाटतं दुसरीकडेच जाऊ

कधी शिक्षक व्हावसं वाटतं
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी
आजकाल विद्यार्थी हा बदलला
कधीही न बदलण्यासाठी

वाटते कधी करावी कंपनीत
एखादी नोकरी
पण पगाराकडे पाहून
मिळत नाही लग्नासाठी छोकरी

कधी वाटते मला बनावे
शेतकरी एक चांगला
पण हमीभाव नाही मिळत
शेतकर्‍याच्या मालाला

कधी वाटते मारावी
आकाशात  गरूड भरारी
पण पंखात नाही बळ
म्हणून मन नाही घेत उभारी

कधी वाटते सोडून सारे
व्हावे हिमालयात संन्यासी
पण नाही राहता येत
मला मात्र कधी उपासी

कोणते शिक्षण घ्यावे
याचाच पडला प्रश्न मला
सगळीकडे आहे बेरोजगारी
माझ्या शिक्षणाचा फायदा होईल का स्वत:ला

कोणती वाट निवडावी
हे काहीच कळतं नाही
सांगणारेही आहेत गोंधळात
बिचारे स्पष्ट काही बोलतचं नाही

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...