कसा जगला
किती वर्ष आयुष्य जगला
याला नसते काही महत्व
कसा जगला ते आयुष्य
हेच आहे जीवनाचे सत्व
किती व कोणते सुख उपभोगला
हे कुणी नाही विचारणार
पण कुणाला सुख दिले
हे मात्र लोक नाही विसरणार
किती लोकांचे डोळे पुसले
हे आहे महत्वाचे
किती लोकांना रडवले
हे आहे बिनकामाचे
किती जणांना दिला आधार
हे लोक ठेवणार मनात
अन् किती जणांना केले निराधार
हे मात्र ठेवणार लक्षात
आपल्या कुटूंबासाठी जगतात
सगळेच माणसे
इतरांसाठी काय केलेत
हे मात्र ध्यानात ठेवणार तीच माणसे
पोट भरण्यासाठी सगळेच
पडतात तुटून
दुसर्याचे पोट भरण्यासाठी
किती जातात धावून
अनेक वर्ष जगला
याची गिणती नाही उपयोगाची
कुणासाठी जगला ही मात्र
माहीती आहे महत्वाची
वर्ष मागे वर्ष
निघून जातात आयुष्यांची
निरोगी आयुष्य येते वाट्याला
फार मोजक्या लोकांची
चिंतन मनन चालू असते
संसाराच्या न मिळालेल्या गोष्टींचे
भगवंताचे चिंतन फारच थोडे करतात
पण तेच सार आहे जीवनाचे
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment