Skip to main content

अर्थहीन शब्द

शब्द झाले अर्थहीन

आजकाल नाही राहीली
शब्दाला  फारशी किंमत
शब्द देतात पण
कुणीच नाही पाळत

सहजच घेतात काहीजण
शपथ आपल्या आईची
घाई असते शब्द
फक्त फेकायची

काम करून दाखवणारचं
असा शब्द देतात
पण काही दिवसांनी
सर्व काही विसरतात

सात फेरे घेताना
उच्चारतात शब्दाने मंत्र
जीवनात मात्र मंत्रांना
काहीच  नसतो अर्थ

तोंडी शब्दांना नाही
काही अर्थ राहिला
लेखी  देऊनही फसगतीने
माणूस हैराण झाला

पूर्वी शब्द दिला की
हमखास व्हायचे काम
आता शब्दा बरोबरच
हवा असतो दाम

आम्ही आईबाबांचा शब्द
खाली पडू नव्हतो देत
आता आईबाबांच्या शब्दाला
नाही राहीली किंमत

पूर्वी शब्द म्हणजेच
होता  दृढ विश्वास
आता शब्द देऊन
घात होतो हमखास

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...