शिक्षकदिन
शिक्षकांना देतो आज शुभेच्छा
मागण्या होतील पूर्ण ही करतो इच्छा
तुम्ही आहात म्हणून सगळे घडले
विविध पदांवर माणूस जावून पोहचले
तुम्ही आहात एक जादूगार
कोणतेही पद नाही ठेवले दूर
तुमच्यामुळे गरीब झाले श्रीमंत
लोक आहेत तुमच्याचमुळे सत्तेत
विद्यार्थ्यांना मोठे करून तुम्ही राहिलात जमिनीवर
साधी राहणी आणि आहेत तुमचे उच्च विचार
जे झाले तुमच्यामुळे मोठे
त्यांच्यामुळेच होतात बर्याचवेळा तोटे
समाजाचे विचार बदलण्याची ताकद आहे तुमच्यात
शिक्षक वजा केल्यावर होईल सर्व शुन्यांत
शिक्षकांचा वाटला पाहिजे अभिमान
नतमस्तक व्हावे सर्वांनीे त्यांना बघून
आंदोलनाशिवाय झाल्या पाहिजे मागण्या पूर्ण
शिक्षक असतो गुणांनी परिपूर्ण
शिक्षक म्हणजे चालते बोलते ग्रंथालय
असते कायम त्याच्यांभोवती विद्यार्थ्यांचे वलय
शिक्षक असतो ज्ञानाची गंगा
कुणी घेऊ नये त्याच्याशी पंगा
शिक्षकाशिवाय कोणते पद नाही मोठे
सगळे आहेत त्याच्यापेक्षा छोटे
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment