Skip to main content

जय हनुमान

जय हनुमान

जन्मला माता अंजनीच्या पोटी
आहे नाम राम तुझ्या ओठी

प्रभु रामाचा आहे तू सेवक सच्चा
हे जाणतो गल्लोगल्लीचा बच्चा

मारली उंच उडी श्रीलंकेला
सितामाईचा शोध तू  लावून दाखवला

घेतला होता पंगा रावणाशी
कारण प्रभू राम होता तुझ्या पाठीशी

भल्या भल्या राक्षसांना लोळवले
आपल्या अचाट शक्तीने त्यांना आसमान दाखवले

संजीवनी आणून वाचवले प्राण लक्ष्मणाचे
दाखवले सर्वांना शौर्य आपल्या शक्तीचे

संजीवनीसाठी उचलला तू अख्खा पर्वत
आणि केली संकटावर तू मात

सितामाईने दिलेला हार चावून दिला फेकून
त्याच्यात राम नाही असे दिले तू कारण

छाती फाडून दाखवले रामसिताचे स्वरूप
असा भक्त होणे नाही काळानुरूप

चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहशील अमर
तुझ्या जपाने तरतील लोक हा भवसागर

जय जय हनुमान की जय
जय जय श्रीराम की जय

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...