बावीस वर्ष लग्नाची
झाले बावीस वर्ष आमच्या लग्नाला
सारी सुख दु:ख झेलून
आहेत आम्ही आजही बरोबर
आनंदाने पावलो भरून
सुख दु:खात दिली आम्ही
एकमेकांना चांगली साथ
झाल्या असतील काही चूका
नाही केली बंद बात
सगळ्यांच्या सुखासाठी झटलो
केला प्रयत्न दुसर्याच्या आनंदासाठी
परतीची कोणतीही अपेक्षा न करता
झटलो मात्र त्यांच्यासाठी
आहेत दोन लाडके
आमच्या संसाराच्या वेलीवर
चमकतात आपल्या क्षेत्रांमध्ये
घेऊन चांगले संस्कार
त्यांना घडवण्यात आई म्हणून
आहे तुझा वाटा मोलाचा
वेळप्रसंगी मनस्ताप सहन करून
केला विचार त्यांच्या भल्याचा
वाटतो मला तुझा अभिमान
नाही केला विचार तु तुझ्या स्वप्नांचा
कायम करत राहिली आमची चिंता
ध्यास घेतला होता तू आमच्या प्रगतीचा
रात्रंदिवस झटली आमच्यासाठी
तुझा विचार बाजूला करून
सतत आम्ही तुझ्या मनात
विचार करून डोळे येतात माझे भरून
झाला असेल मनस्ताप तुला
नाही वागली तू खोटे
सगळ्यांना माफ करत
केले तू मन मात्र मोठे
सगळ्यांना आधार देत
तुला वाटले कधी निराधार
स्वत:च कुढत राहुन
दु:ख दिसू नाही दिले चेहर्यावर
घर असो की काॅलेज असो
उमटवला तू आपला ठसा
नातेवाईक व मित्रांसाठीही धावते
नाही टाकला तू तुझा वसा
तू मला हवीस
अनेक जन्मांची सोबती
माफ कर माझ्या चुकांबद्दल
राहावी आपल्यातील कायम दोस्ती
जावो आपले आयुष्य
असंच सुखासमाधानाने
देवाची अशीच कृपा राहो
देवा ठेव आम्हांला आनंदाने
तुझाच दोस्त कवी पती दगा
Comments
Post a Comment