Skip to main content

पावसाची थट्टा

पावसाची थट्टा

वर्षानुवर्ष पाऊस थट्टा करतो आहे .जेथे पडतो तेथे भरमसाट पडतो .लोकांना कंटाळा येतो व बोलू लागतात बस झाले आता तरीपण तो सतत कोसळत असतो .प्रचंड नासाडी करतो लोकांना बेघर करतो इमारती वाहून जातात लोकं वाहून जातात झाडे कोसळतात डोंगर खचतात जिकडे तिकडे पाणिच पाणी करतो जणू काय त्या लोकांची थट्टा करतो व दुसरीकडे पूर्ण पाठ फिरवतो पेरण्या होत नाहीत जरी झाल्या तरी पिके करपून जातात विहिरींना पाणी नाही नद्या नाल्या कोरड्या पडतात शेतकर्‍याच्या जनावरांना चारा नाही की पाणी नाही सारखे आभाळाकडे डोळे लावून बसतात काहीवेळा आभाळ भरून यूते पण बरसत नाही काहीवेळा पावसाळ्याचे दिवस आहेत की उन्हाळ्याचे तेच समजत नाही .काय खावे व कसे जगावे हा प्रश्न उभा ठाकतो .तक्रार तरी कुणाजवळ करावी तो कुणाच्याच हातात नाही देवाला साकडे घालूनही जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा वाटते तो कुणाच्याच हातात नाही .बर्‍याचवेळी सुरवातीला चांगला पडतो पण ऐन पिके भरात आली की गायब होतो व हातात आलेली पिके वाया जातात .शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे राहतात अशावेळी काय करावे हेच सुचत नाही .आपल्या हातात राहिले असते तर त्या पावसाच्या देवाला ताबडतोब निलंबित केले असते .ऐन पावसाळ्या दिवसात कडक उन जेव्हा पडते तेव्हा संताप संताप मनात येतो पण शेवटी तो संताप निरर्थक ठरतो .झाडे लावली टरी त्याकडेही पाठ फिरवतो .असं का वागतो तो पाऊस .त्याच्याकडे प्रचंड साठा आहे पावसाचा पण त्याची नेमणूक करताना चूक झाली असे वाटायला लागते नको त्याला एवढे महत्वाचे काम दिले पण तो मात्र बेफिकिर सारखा वागतो.कोणतेही नियौजन त्याच्याकडे नसते बिचारे लोक त्याची आतुरतेने वाट पाहतात पणहा मात्र कशी वाट लागेल हेच बघत असतो.अनेक वर्ष असेच चालले आहे व त्याला वाचारणारा कोण नाही हे मात्र सत्यं.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...