गोपाळसागर लढा(गोपाळ मोरे)
दरवर्षी पडलेल्या दुष्काळाने
गोपाळराव मोरे व्हायचे दु:खी
काहीतरी पाण्यासाठी करावे
यासाठी व्हायचे ते कष्टी
धरण बांधण्याचा विचार
आला त्यांच्या डोक्यात
त्यासाठी झिजवले त्यांनी उंबरठे
फक्त धरणाचा विचार होता मनात
एक शेतकरी धरण बांधण्याचे
सांगतो आहे सर्वांना
हे पाहून सगळ्यांनी
वेड्यात काढले त्यांना
सरकार दरबारी निवेदन
देऊन देऊन थकले गोपाळराव
कुणीच घेत नव्हते दखल
पण माघारी फिरले नाही राव
धरण बांधून होईपर्यंत चप्पल
नाही घालणार अशी घेतली शप्पथ
अनवाणी फिरले सगळीकडे
पण कुणीच मानत नव्हते त्यांची बात
आमदार खासदार मंत्री यांच्या
घेत होते ते गाठीभेटी
उपाशी तापाशी राहून
लढा दिला त्यांनी शेवटी
त्यांचा लढा गेला होता
इंदिराजींच्या कानी
भेटण्याची वेळ त्यांनी देऊन
धरणाची मंजूरी दिली त्या ठिकाणी
धरणाच्या लढ्यासाठी प्रपंचाची
झाली होती ससेहोलपट
संसाराची चिंता न करता
करत राहिले ते दिल्लीपर्यंत पायपीट
धरण बांधायला सुरवात करुन
पूर्ण झाले बांधून धरण
जल्लोष केला सगळ्यांनी
धरणात पाणी बघून
धरण बांधण्यावेळी गोपाळरावांना
आला होता पक्षाघात
मुकी झाली होती वाचा
पण धरण होते त्यांच्या मनात
स्वार्थी लोकांनी धरणाच्या कार्यक्रमात
घेतली नाही त्यांची दखल
किती त्रास झाला असेल त्यांना
असे लोकांचे बघून वागलेल
काही लोकांनी धरणाच्या पाण्याचा
कळस आणला त्यांच्या घरी
डोळ्यातून वाहत होत्या धारा
शेवटी लढा यशस्वी झाला तरी
गोपाळराव नाही आज
राहिले या जगात
पण गोपाळसागर धरण बघून
आनंद मावत नसेल त्यांच्या मनात
गोपाळरावांना करतो मी
सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा
त्यांनी दिलेल्या लढ्यावर
असतील लोकांच्या कायम नजरा
प्रा. दगाजी देवरे
रुपारेल काॅलेज मुंबई
7738601925
Comments
Post a Comment