गेटटुगेदर
गेटटुगेदर म्हणजे नसते
फक्त मित्रांच्या गाठीभेटी
मिळते त्यातून नवीन उर्जा
पुढच्या जीवनासाठी
गेटटुगेदरमुळे होतात आठवणी ताज्या
होतो माणूस लहानाहूनी लहान
गळतो त्याचा अहंकार आणि गर्व
परमानंदी झेप घेते मात्र मन
गेटटुगेदरमुळे होते मन हलके
मारून गप्पा मित्रमैत्रिंणींशी
त्याची आहे आज गरज
एरवी माणूस बोलतो तरी कुणाशी
गेटटुगेदरमुळे विसरायला होते
आपले पद व आपण कोण
उरतो फक्त आनंद
भरून पावते मित्रांना भेटून मन
गेटटुगेदरमुळे मिळतो बदललेला
चेहरा बघायला
पण आतील मन असते तेच
ते मिळते गेटटुगेदरमुळे वाचायला
गेटटुगेदरमुळे मिळतो शरीराला
नवीन ताजा आॅक्सिजन
तो मिळत नाही बाजारात
कितीही किंमत मोजून
गेटटुगेदर म्हणजे नसते
माणसांची फक्त गर्दी
जीवनात आनंद येणार
हे देणारी असते ती वर्दी
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment