गोष्ट पाण्याच्या बुडबुड्याची
पाण्यापासून एक बुडबुडा तयार झाला व तो निघाला प्रवासाला वास्तविक प्रवास स्वत:हून करणे त्याच्या हातात नव्हते जिकडे हवा जाईल तिकडे तो जायचा पण तरीही त्याला वाटायचे मी स्वत:च चालतो आहे व हवेत तरंगताना एवढा अभिमान भरला त्याच्यात की माझ्यासारखा जगात कुणीच नाही असे त्याला वाटायचे अशा काही ऐटीत चालायचा की इतर त्याला तुच्छ वाटायचे .मी म्हणजे कुणीतरी आहे माझ्यासारखा श्रेष्ठ जगात कुणीच नाही माझे अस्तित्व क्षणभंगूर नाही .दिसायला कितीतरी सुंदर आहे सूर्य प्रकाशात माझे तेज अजूनच खूलून दिसते मग तो आपल्याच मस्तित चालायचा. अहंकाराने त्याला आजूबाजूचे काहीही दिसायचे नाही .आपले आयुष्य फक्त काही क्षणाचे आहे हे मानायला तो तयार नव्हता .हवा त्याची दिशा ठरवायची पण कोण ती हवा मी तिला ओळखत नाही व मानतही नाही असे म्हणायचा असे चालता चालता एक दगड त्याच्या समोर आला आपण दगडावर आपटणार हे त्याला दिसत होते म्हणून त्याने दिशा बदलण्याचा प्रयत्न केला पण दिशा तो स्वत:हून बदलू शकत नाही याची त्याला जाणीव झाली व आपले अस्तित्व आता संपणार .समोर आपला मृत्यू दिसत असूनही आपली त्याच्यापासून सुटका नाही याची त्याला जाणीव झाली त्याला दरदरून घाम फुटला भीतीने त्याचा थरकाप झाला आपली कुणीच सोडवणूक करू शकणार नाही असे त्याला वाटू लागले व क्षणातच त्याचा अहंकार गर्व गळून पडला पण ती वेळ निघून गेलेली होती व पश्चातापाशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हते व क्षणाचाही विलंब न होता दगडावर आपटला व त्याचे अस्तित्व संपले व निसर्गापुढे किती क्षणभंगूर होता तो हे पटले व हा बुडबुडा म्हणजेच माणसाचे आयुष्य.दगडावर आपटण्यापूर्वीच सावध झालो तर नक्कीच जीवन आनंदात जाईल आपले व इतरांचे
बघा पटतं का
प्रा.दगाजी देवरे
Comments
Post a Comment