Skip to main content

भारती मोरे

भारती एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व

भुतकाळात डोकावतांना एकच
चेहरा लक्षात राहिला
उत्साही सतत हसतमुख
सकारात्मक विचार तुझ्यात दिसला

रूप आणि गुण याची दिली
देवाने देणगी तुला भरभरून
त्याचा कुठेही दिसत नाही गर्व
हे बघून आनदी होते सगळ्यांचे मन

कोणतेही काम करताना
अत्यंत नियोजन पध्दतीने करते
त्यात कोणतीही करत नाही कसूर
सर्व अडचणींवर मात करते

बोलताना किती मुद्देसुदपणे स्पष्ट
मांडते तू सगळ्यांसमोर
सगळे करतात ते  बिनशर्तपणे मान्य
कारण ते असते प्रकाशाएवढे खरं

सगळ्यांवर छाप पडेल
असे आहे तुझे व्यक्तीमत्व
विचार आहेत तुझे स्पष्ट
हेच तुझे असेल जीवनाचे तत्व

बोलताना प्रचंड आत्मविश्वास
असतो तुझ्यात भरलेला
अशा व्यक्ती क्वचित दिसतात
मी प्रत्यक्ष तो  अनुभव अनुभवला

फोटो सेशनची तुला आहे
मनापासून खूप आवड
कारण तुझे फोटो चांगलेच येतात
त्यासाठी काढते तू  सवड

जेथे जाते तेथे फुलविते
सगळीकडे आनंद
तुझ्या मनापासून समर्पणाला
देतात तुला दाद

जशी काॅलेजला होती
तशीच आज दिसते
म्हातारपणंही म्हणेल तुला
मी तुझ्यापुढे गुडघे टेकते

समाजसेवा करायला तुला
खूप खूप आवडते
त्याचा करत नाही बोभाटा
हे मनाला जास्त पटते

ग्रुपसाठी तू आहे एक
सकारात्मक प्रेरणा
तुझा उत्साह बघून आमच्यासारखाच
खूश होत असेल जगाचा राणा

अशीच कायम आनंदी राहा
अशी देवाकडे करतो इच्छा
त्यासाठी मी तुला पाठवितो
छान छान शुभेच्छा

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...