Skip to main content

देवांचा देव

देवांचा देव

देवांचा देव आहे विठ्ठल
आहे तो उभा पंढरपूरी
नाही आणिला नाही बसविला
आला तो पंढरपूर नगरी

संत झाले त्याच्याभोवती गोळा
झाला तो त्यांचा आधार
करीती आषाढी कार्तिकी वारी
सुख मिळते त्यांना भरपूर

वैकूंठ सोडूनी आला तो
भक्तांसाठी भूमंडळी
विठ्ठल विठ्ठल नामाने
चिंता सार्‍या हरतील

चालती भक्तजन पायी पायी
करिती वारीत विठ्ठलाचा गजर
विसरतात दु:खं सारी
करिती जप नाही बघत सकाळ दुपार

संसार असार विठ्ठल हे सार
म्हणती माऊली ज्ञानेश्वर  संत तुकाराम
करू या भजन विठ्ठलाचे
घेऊ या अंतरी त्याचे नाम

आषाढी कार्तिकी असा
सोहळा नाही स्वर्गी
त्याच्या नामाने लागतात
भक्तजन सतमार्गी

म्हणू या विठ्ठल विठ्ठल
गाऊ या विठ्ठल विठ्ठल
नाचू या म्हणूनी विठ्ठल विठ्ठल
बघू या ऐकू या विठ्ठल विठ्ठल

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...