Skip to main content

अभ्यासाशिवाय मत मांडणे अयोग्य

अभ्यांसाविना मत मांडणे अयोग्य

बरेच जण अभ्यांसाविना बोलत असतात व आपले मत मांडतात व जे योग्य मार्गाने जात असतात त्यांना मार्गातून विचलित करतात .महत्वाचा विषय म्हणजे जगात देव आहे किंवा नाही  तसेच समाधी घेतात म्हणजे काय किंवा संत तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात बुडविल्या तसेच ते सदेह विमानाने गेलेत याबद्दल बरेच जण शंका व्यक्त करतात पण ज्या विषयाचा आपला काडीचाही अभ्यांस नाही त्या विषयी बोलण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही .ते ज्या अवस्थेला पोहोचलेत त्या अवस्थेबद्दल अनुभव घेतल्याशिवाय काहीही मत मांडण्याचा अधिकार नाही .देव आहे किंवा नाही अशांनी वेद उपनिषदे गीता भागवत कुराण बायबल ग्रंथसाहेबा तसेच अनेक संताचे साहित्यांचे किती वाचन केले व केले तर किती आचरणात आणले व त्याचा अनुभव किती घेतला असे काहीही न करता मत मांडून मोकळे होतात .दुकानात एखादी वस्तू आहे किंवा नाही एवढा साधा विचार तर नक्कीच नाही देव आहे किंवा नाही .ज्याने कधी गीता बघितली नाही भागवत तसेच अनेक संताच्या साहित्याला स्पर्शही केलेला नाही व तरीही मत देऊन मोकळे होतात .संताना देवाच्या नामाने कोणती अवस्था प्राप्त होते याचा अभ्यास न करताच समाधीबद्दल उगीचच आपले मत मांडता .संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्यासारखी उंची गाठावी लागेल तरच त्याचे उत्तर मिळू शकेल म्हणून कोणत्याही विषयाचा पहिले अभ्यांस केला पाहिजे व त्याच्या खोलात गेले पाहिजे मग कळेल खरं काय आहे.वरवर मत मांडण्याचा तो विषय एवढा सोपा नाही .त्यांना जी अवस्था प्राप्त झाली त्यामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांचा बदलला व जग हे त्यांना भासमान वाटू लागले व खर्‍याची ओळख झाली व त्या खर्‍याचे गुणगाण त्यांनी आपल्या साहित्यात लिहून ठेवले .आपल्याला जीवनातले साधे प्रश्न सोडता येत नाही व काहीजण तर जीवनातल्या अडचणींनी हैरान होऊन आत्महत्या करतात पण संत या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असतात व हे प्रश्न त्यांना प्रश्नच वाटत नाही व त्यामूळे या प्रश्नांचा अडचणींचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही कारण त्यांना माहीत झालेले असते की हे सारे प्रश्न किंवा अडचणी दिखावा आहेत त्या खर्‍या नाहीत कधीतरी बदलणार्‍या आहेत व त्या पलीकडे ते गेलेले असल्यामुळे त्यांना या क्षुल्लक वाटतात व खरे काय आहे याची जाणीव झाल्यामुळे व सगळीकडे तेच त्यांना दिसायला लागते व ते खरे त्यांच्या एवढे जवळ असते की त्यांना कुठे जायची गरज पडत नाही व ते आपल्याच धुंदीत असतात व आनंदी असतात .अशी अवस्था येणे फार कठीण गोष्ट आहे व त्या अवस्थेपर्यंत पोहचा अनुभवा मग मत मांडा नाहीतर गप्प राहिलेलेच बरे.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...