Skip to main content

याला काय म्हणावे

याला काय म्हणावे

घरात नाही खायला दाना
म्हणतो मला म्हणा राणा

गाडी नाही त्याच्या दारात
म्हणतो मला चालायला आवडतं

खिशात नाही एक दमडी
म्हणतो मला चालत नाही कोंबडी

सदा असते त्याचे मन बेचैन
म्हणतो असावे कायम समाधान

शिव्या असतात त्याच्या तोंडात
म्हणतो मौनाने भर पडते प्रगतीत

दुसर्‍याबद्दल बाळगतो द्बेष मत्सर
म्हणतो त्याच्यावर उधळा प्रेमाचा सागर

देवाबद्दल आहे त्याला आकस
वाटते  देवाने द्यावे त्याला भरगोस

चप्पल बूट घेण्याची नाही त्याला ऐपत
म्हणतो अनवाणी चालायला येते फार गंमत

टीव्ही घ्यायला नाही त्याच्याकडे पैसा
म्हणतो टीव्ही म्हणजे वाईट आरसा

बील भरायची नाही त्याची कुवत
म्हणतो लाईटमुळे डोळे दुखतात

लग्नाला नाही मिळत त्याला मुलगी
म्हणतो लग्नामुळे बरबाद होते जिंदगी

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...