पराधीन आहे जन्म मानवाचा
पराधीन आहे जन्म मानवाचा
काहीही हाती नाही त्याच्या
सुखाच्या राशी जरीअसतील
तरी शेवटी नाही उपयोगी त्याच्या
कटपुतली आहे मानव
नियतीच्या हातातले
काहीच घडत नाही
माणसाने ठरवलेले मनातले
वय पद पैसा सौदर्य याच्याशी
काहीच त्याचे देणेघेणे नसते
कोण कधी जाईल हे
त्यालाच फक्त ठाऊक असते
चांगल्या लोकांना आयुष्य
फार कमी असते
हे मात्र पडलेले एक कोडे
त्याचे उत्तर कुणाला माहीत नसते
जे घडते ते फक्त बघत राहणे
हेच माणसाच्या आहे हाती
आहे त्याचा स्विकार करणे
हे पडते माणसाच्या माथी
चंद्रावर गेला माणूस
शाबासकी देतो स्वत:ला
पण उद्या आपले काय होणार
हे माहीत नसते त्याला
क्षणात माणसाचे नशिब
बदलून जाते
माणसाला नाही कुणावर विश्वास
पण हे मात्र कुणीतरी करत असते
नियतीपुढे लोटांगण घालण्याशिवाय
माणसाकडे नाही कोणता पर्याय
कितीही झाला मोठा माणूस
मृत्यूपुढे नाही कोणता उपाय
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment