Skip to main content

देव एकचि

देव एकचि

कुणी बोलावे कृष्ण
कुणी बोलावे राम
कुणी बोलावे अल्ला
कुणी बोलावे रहिम
देव तो आहे एकचि

कुणी बोलावे येशू
कुणी बोलावे महावीर
कुणी बोलावे शिव
कुणी बोलावे पैगंबर
देव तो भरला एकचि

कुणी बोलावे कबिर
कुणी बोलावे ज्ञानोबा
कुणी बोलावे महामुनी
कुणी बोलावे तुकोबा
देव तो आहे एकचि

कुणी बोलावे संत मीराबाई
कुणी बोलावे संत जनाबाई
कुणी बोलावे संत कानोपात्रा
कुणी बोलावे संत मुक्ताई
देव तो आहे एकचि

कुणी बोलावे भगवान बुद्ध
कुणी बोलावे भगवान वामन
कुणी बोलावे भगवान परशुराम
कुणी बोलावे भगवान गजानन
देव तो आहे एकचि

कुणी घ्यावे नाम
कुणी करावे तप
कुणी करावा नमाज
कुणी करावा जप
देव भेटेल एकचि

कुणी जावे चर्चमध्ये
कुणी जावे मंदिरात
कुणी जावे जैन मंदिरी
कुणी जावे मस्जिदीत
देव आहे तेथे एकचि

कुणाचा धर्म हिंदू
कुणाचा धर्म जैन
कुणाच धर्म इस्लाम
कुणाचा धर्म ख्रिश्चन
देव आहे सगळ्यांमध्ये एकचि
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...