न दिसणारं ओझं
एक वेळ शरीरावर असलेले ओझं आपल्याला उतरविता येते पण मनावर असलेले न दिसणारे ओझे मात्र उतरविणे फार अवघड असते .ते दिसत नाही पण जाणवत राहते मग कुणी आपल्यावर उपकार केले असतील व आपण त्याची जाणीव ठेवली नसेल याची खंत मनावर असणे किंवा आपली संपत्तीवरुन किंवा पैशावरुन कुणी केलेली फसवणूक असेल तसेच कुणीतरी आपला अपमान केला असेल .आपला विश्वासघात झालेला असेल .आपल्याकडुन काहीतरी चूक झाली असेल व ती आपण दडवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल.आपल्याला काहीतरी करायचे होते पण भलतेच झाले .आपण मनात ठेवलेली स्वप्नं धुळीला मिळाली असेल .आपली प्रिय व्यक्ती आपल्याला कायमची सोडून गेली असेल व तिच्या किंवा त्याच्या आठवणी त्रास देत असतील अशा अनेक गोष्टी आपल्या मनात घर करुन बसतात व वेळोवेळी डोकं वर काढतात .आपल्या मनावर ओझे बनुन राहतात व त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो आपल्याला शांत वाटत नाही .जास्तच विचार करत बसलो तर हार्टवर त्याचा परिणाम होतो व आजार सुरु होतात ,blood pressure सुरु होतो .मनावरील त्या ओझ्यामुळे अनेक शरिराच्या तक्रारी सुरु होतात तेव्हा त्या गोष्टी हळुहळु मनातून काढून टाकल्या पाहिजेत सकारात्मक विचाराने त्या निघू शकतात किंवा तुमच्या अनुभवाने त्या काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे .गंमत म्हणजे आपण त्या गोष्टीचे नेहमी स्मरण करत राहतो ,बोलत असतो कुणाजवळ कायम. त्यामुळे त्या गोष्टींना उजाळा मिळतो व मनावर परत नवीन रुपाने त्या उमटतात .अशा गोष्टीचे स्मरण न केलेले बरं .जोपर्यंत अशा गोष्टी जात नाही तोपर्यंत चांगल्या गोष्टी साठविण्यासाठी जागा मिळत नाही म्हणून मनावर हे न दिसणारे ओझे कसे उतरविता येईल व ज्या दिवशी ते उतरेल त्या दिवसापासून एकदम हलकं वाटायला लागेल .स्वत:ला व इतरांना माफ करणे हा सोपा उपाय असतो ते ओझं कमी करण्यासाठी.forgiveness आपल्याला व इतरांना केले तर काम सोपे होते .बघा जमतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment