झोप
झोप आहे देवाने दिलेली देणगी
प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी
सुख दु:खापासुन करते ती सुटका
आपल्याला कुशीत घेणारी
श्रीमंत गरीब नसतो तिच्यात भेदभाव
जात धर्म देश ठिकाण ती नाही बघत
पशू पक्षी किटक यांनाही कवेत घेऊन
शांती देते त्यांना झोपेत
सत्ता पैसा कमी जास्त असला
तरी लोक जगतात
पुरेशी झोप नसली
तर माणसाचे मन नाही लागत
झोपेमुळे होतो माणूस ताजातवाना
दैनंदिन काम करण्यासाठी
झोपेसारखे नाही कोणते औषध
माणसाला उर्जा मिळविण्यासाठी
आयुष्याचा अंत जेव्हा होतो
तेव्हा म्हणतात त्याला गाढ झोप
कुणीच मोडू शकत नाही
असते ती चिरंतन झोप
झोपेमध्ये माणूस विसरतो
स्वत:ला आणि जगाला
शांतीच्या महासागरात डुंबून
जागे झाल्यावर उर्जा मिळते त्याला
झोपेसारखे साधन नाही
कोणत्याही जगात
नियतीने फुकट बहाल केले
म्हणून शांती नांदते आत
काहींना भेटत नाही झोप
ते घेतात गोळ्या झोपेच्या
झोप नेहमी हजर असते
दारी प्रामाणिक कष्टकर्यांच्या
झोपेमुळे माणूस विसरतो
स्वत:ला श्रीमंत आणि गरीब
झोप घेते सगळ्यांना मिठीत
चालत नाही तिच्यापुढे कुणाचा रुबाब
दिवसभर प्रामाणिकपणा ठेऊन
रात्री झोप लागते शांत
काही चुकीचेे काम झाले तर
झोप कधीच नाही फिरकत
झोप ठेवतेे माणसाला
सर्व पाशांपासून लांब
माणूस विसावतो तिच्यात
विसरुन सर्व बाब
आयुष्यांची शेवटची झोप
विसरायला लावते पूर्ण जीवन
त्या झोपेतून जागे झाल्यावर
मिळालेला असतो जन्म नवीन
कुणी भेटेलच रोज
याची शाश्वती नाही
झोप येते नक्की भेटायला
तिच्याशिवाय जवळचे कुणीच नाही
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment