Skip to main content

उठा आता वेगू करा

उठा आता वेगू करा

नका करू आळस
नका करू कंटाळा
उठा आता वेगू करा
अवघे जन सकळा

सोडा वाईट व्यसने
नाही दिवस आता उरले
चालला आहे एक एक दिवस
खूप आयुष्य वाया गेले

काळ खातो एक एक दिवस
म्हणून सावध व्हरे आता
व्हा जागे  तुम्ही झोपेतून
करा चांगले काम येता जाता

जे जे ठावे ते टाकावे देऊन
हिच करावी मानवसेवा
स्वत:चाच विचार करून
नुसते खात बसू नये मेवा

लागतो  एक क्षण
श्वास बंद व्हायला
त्याआधी व्हारे सावध
आपले हित साधायला

योग प्राणायाम आहे
जीवनाचा मुख्य गाभा
नका करू दुर्लक्ष
नाहीतर करा तोबा तोबा

आयुष्य आहे सिमित
नका घालवू वाया
आता तरी व्हारे जागे
उरेल एक दिवशी फक्त काया

भरपूर आहे आयुष्य
हा आहे एक भ्रम
वर्ष सरतात भराभर
जवळ येत असतो मुक्काम

करू या भजन विठ्ठल विठ्ठल
भरेल आत  भरपूर उर्जाश्रश्रश्रफ
होतील कामं चांगले
अन् वाढेल आपला दर्जा

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...