देव नाही बाजारातला भाजीपाला
बर्याच जणांचे मत आहे की जगात देव नाही .जी गोष्ट आपण नाही म्हणतो त्याआधी त्याचा पूर्ण अभ्यांस करावा व मत मांडावे .समजा एखाद्याला गणितातला pg level चा प्रश्न विचारला की ज्याला साधे वजाबाकी बेरीज माहीत नसते ती व्यक्ती म्हणेल की या जगात गणित वगैरे काही नसते तसे झाले. आपल्या घरात बाप नावाचा माणूस असतो त्याची आपण लेकरे तोच आपला सांभाळ करतो .घरातल्या सर्व गरजा भागवतो त्याच्यामुळेच घर चालते व मग घरातील मुले मोठी झाली की त्यांनी म्हणायचे बाप नावाचा कुणीही नसतो तसे झाले. या जगात आपोआप काहीही होत नसते. आपले घर चालवायला कुणीतरी असतो तरच चालते मग हे विश्व काय कुणाच्या सत्तेशिवाय चालते काय?एका पर्वताच्या पायथ्याशी मुंगी असते व ती म्हणते मला जेवढे दिसते तेच विश्व आहे .पर्वत किती मोठा असेल ? ती तिची कितीही बुद्धी वापरली तरी पर्वत बघू शकत नाही कारण तिच्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या .त्याचप्रमाणे आपली मानवाची बुद्धी पण तेवढीच तोटकी आहे की त्याला आपण बघणे किंवा तो केवढा असेल याची कल्पना करणेही शक्य नाही.त्याचे वर्णन करताना वेदही थकले .ते म्हणतात नेती नेती नेती.त्यांची वाचाही कुंठीत झाली.जे देवांनाही कळले नाही की खरी शक्ती कोण आहे .त्यांचीही बुद्धी कुंठीत झाली .त्यांच्याही बुद्धीच्या पलीकडे आहे तो. मग मानवाची बुद्धी कुठे वर्णन करेल .आपले साधे घर चालवताना दमशाक होते तेथे तो ब्रम्हांडाचा नायक बद्दल नुसते विचार करणेही अवघड.त्याच्यात जे आहे ते त्याने आपल्याला देऊन टाकले व ते गुण आपण विकसित केले तर त्याच्यासारखे आपण होणार व त्याच्यात व आपल्यात काहीच फरक नसणार तो म्हणजेच आपण वआपण म्हणजेच तो.तुकाराम महाराजांच्या भाषेत देव पहावयाशी गेलो तो देवच होऊन ठेलो.त्याच्या नुसत्या संकल्पनेने विश्व तयार होते.विश्वात किती तरी तारे ग्रह आहेत .किती आकाशगंगा असतील याचा आपण विचारही करु शकत नाही व संपूर्ण विश्वात पृथ्वी हा एका टिंबासारखा ग्रह आहे .विश्वाचा विचार केला तर पृथ्वी ही नगण्य आहे .अशा किती तरी पृथ्वीसारखे ग्रह आहेत त्या सर्वांचा शोध घेणे आपल्या बुद्धीच्या पलिकडे आहे .त्यामुळे जे हे विश्व पसरले आहे ते असे कुणाच्या सत्तेशिवाय आपोआप चालत नाही .यासर्व गोष्टीचा विचार केला की मुंगीच्या बुद्धीसारखी आपली बुद्धी वाटायला लागते वआपण किती क्षुद्र आहोत विश्वापुढे .आपली तोटकी बुद्धी वापरुन म्हणतो देव नाही. तो काय बाजारातला भाजीपाला नाही .सहजच तो सापडेल म्हणून .ज्यांना तो उमगला त्यांना हे सर्व विश्व त्याच्यात दिसले. एवढा मोठा अवाढव्य त्यांनी पाहिला व तो एवढा सूक्ष्म दिसला की अणू रेणू पेक्षाही अतिशय सुक्ष्म. प्रत्येक गोष्टीत दिसला .माणूस देवकणा पर्यंत पोहचला पण त्याच्यापेक्षाही अतिशय सुक्ष्म आहे हे काहींना उमगले म्हणजेच तो एवढा मोठा आहे की विश्व त्याच्यात आहे म्हणून आपल्या बुद्धीने आपण बघू शकत नाही व एवढा सूक्ष्म आहे की त्यालाही आपण बघू शकत नाही म्हणून मुर्तीच्या रुपात त्याची कल्पना करुन त्याचे स्मरण केले जाते वतो जर सगळीकडे आहे तर मुर्तीत पण तो आहे .वास्तविक तो आपल्यामध्येही आहे म्हणून तर आपण जीवंत आहोत त्याच्या शक्तीनेच आपण जीवंत आहोत व आपणच म्हणायचे तो नाही म्हणजे आपणच आपले अस्तित्व नाकारतो .आपणच आपला अपमान करतो आहोत.एकदा त्याच्या नामाची गोडी लागली तर मग तो कळायला लागतो .दिसायला लागतो पदोपदी. त्याचा अनुभव यायला लागतो मग त्याच्या गोडीपुढे संसारातले सुख दु:ख कष्ट पैसा पद प्रतिष्ठा सत्ता हे सर्व तुच्छ वाटायला लागते असे संत सांगतात.माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो .आपल्या गल्लीत झोपलेल्या कुत्र्यांला निर्दयीपणे दांडुक्याने आपण मारतो तशी बुद्धी होणार नाही कारण त्याला किती त्रास होईल मारल्याने असा विचार सुरु होईल .समदृष्टी निर्माण होते .पाण्यात मिठाचा हत्ती टाकला तर पाणी कसे आहे हे हत्तीला सांगणे अवघड असते किंवा पाण्याला विचारले हत्ती कुठे तर त्याचेही उत्तर म्हणजे हत्तीच पाणी झाला. तसे संताना देवाची प्राप्ती झाल्यावर होते .संताना देवाची प्रचिती आल्यावर हा संसार भासमान वाटायला लागतो किंवा स्वप्नवत दिसायला लागतो. जसे स्वप्नात कितीही संकटे आलीत किंवा कितीही दु:ख आलीत पण जागे झाल्यावर ते सर्व खोटे आहे असे वाटायला लागते .त्याचप्रमाणे देवाची प्रचिती आल्यावर संताची तशी स्थिती होते. संसारातल्या कोणत्याही गोष्टीने संत लोक विचलित होत नाही असे संतानी लिहिले आहे आपल्या ग्रंथांत. म्हणून देव समजणे आपल्यासाठी एवढे सोपे नाही पण संतानी सांगितलेल्या मार्गावर चाललो तर त्याला समजणे अवघडही नाही म्हणून जगात देव नाही असे म्हणणे फार सोपे.जेव्हा डाॅक्टर सांगतात हा काही दिवसाचा सोबती आहे तेव्हा मृत्यू समोर दिसायला लागतो .मोठमोठ्या बाता करणार्या लोकांची वाचा बंद होते तेव्हा नातेवाइक पैसा पद हे त्याला वाचवू शकत नाही .देव नाही असे आयुष्यभर म्हणणार्या लोकांचे शेवटच्या क्षणी आपोआप हात त्याच्यापुढे जोडले जातात कारण पुढच्या प्रवासाला तोच सोबती असतो पण त्याला समजुन घेणे व त्या मार्गाचा अभ्यांस करणे फार अवघड व बघितले तर फार सोपे .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे
7738601925
Comments
Post a Comment