Skip to main content

गणरायाचे मनोगत

गणरायाचे मनोगत

पाहून गणरायास वाटले आश्चर्य
पृथ्वीवरची शांतता बघून
ना ढोलताशांचा आवाज
ना टाळ मृदुंग किर्तन

गर्दी कुठेच दिसत नव्हती
माझ्या कोणत्याही ठिकाणी
म्हणून मोकळा श्वास 
घेत होतो प्रत्येक ठिकाणी

सोने नाणी पैशांनी
तिजोर्‍या भरल्या नाही
माझ्या नावाने राजकारण
समाजकारण करताच आले नाही

नाच गाण्यांचा मला 
व्हायचा नेहमी त्रास
यावेळी एकदम शांतता
लागली माझ्या मनास

मोदक मला खायचे होते
भरपूर असे मिळालेच नाही
आईला जाऊन सांगीन
मोदकावीना पोट भरलेच नाही

पाऊस भरपूर मी पाडला
निसर्ग केला हिरवागार
कोरोनाकडे केली वक्र दृष्टी
होईल तो आता हद्दपार

बाळगोपाळ भेटले नाही
याची खंत वाटते मला
नाचायचे होते त्यांच्या बरोबर
भीती वाटत होती त्यांना बाहेर पडायला

कोट्यवधीची उलाढाल
यावर्षी झालीच नाही
माझ्या नावावर असलेला व्यापार
बघायला मला मिळालाच नाही

माझ्या नावाने जमा झालेला पैसा
यावर्षी काही दिसला नाही
त्या पैशांवर त्यामुळे काहींना
 मजा मारताच आली नाही

चाललो मी आज माघारी
देऊन जातो भरपूर आशिर्वाद
पुढच्या वर्षी येईल लवकर
घेऊन सारा हा आनंद

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...