Skip to main content

थोडा वेळ

थोडा वेळ

थोडा वेळ हा जीवनाला कलाटणी देणारा असतो मग तो एक मिनिटापासून पाच मिनिटापर्यंत असू शकतो.बर्‍याच वेळा आपल्या मनाविरूद्ध काही घडले की आपले डोकं फिरते व भावनेच्या भरात आपला पारा एकदम वरच्या थराला जातो व आपल्या हातून नको ते घडते तेव्हा जर त्यावेळी थोडा वेळ जाऊ दिला व शांत मन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या रागाची तीव्रता कमी होईल व आपल्या हातून वाईट होणारी घटना थांबेल.रिक्षा ट्रेन बस यातून प्रवास करतांना बर्‍याच वेळा जागेवरून धक्का मारण्यावरुन भांडणे होतात त्यावेळी थोड्या वेळेचा विचार करावा व शांत राहावे  .पुढे होणारे वाईट परिणाम थांबतील.मित्रमंडळींच्या आग्रहाने आपण एखादी सिगारेट ,गुटखा, तंबाखू, एखादा पेग अजून काही भावनेच्या भरात करायला जातो व तोच क्षण आपल्याला जीवनातून उठवण्याचा ठरतो तेव्हा त्या क्षणाला थोडा समयचा विचार करावा .गावामध्ये आपल्या शेतात कुणाचे गुरे घुसतात किंवा घरात मुके प्राणी घुसतात तेव्हा त्या क्षणाला डोकं फिरते व रागाच्या भरात आपण काय काय करुन बसतो तसेच शेताच्या बांधावरुन भानगडी पाणी भरण्यावरुन तंटे, एखाद्या दिवशी जेवण चांगले न होणे ,घरी उशिरा येणे, खोटे बोलणे,नको तेव्हा खरे बोलणे असे अनेक प्रकारचे प्रसंग येतात त्यावेळी तो क्षण शांत बसलो तर मग पुढचे होणारे अनर्थ टळतात नाहीतर छोट्या गोष्टींवरुन मोठ्या संकटांना आपण आमंत्रण देत असतो व त्यामुळे आपल्या जीवनात अशांतता पसरते . त्या थोड्या समयी संयम ठेवला की मग पुढचे काम सोपे होईल,काही वेळा बोलता बोलता शब्द वाढत जातो व थोड्या समयचा विचार नसल्याने नको ते होऊन बसते.ज्यावेळी थोडा समयचा विचार केला व त्या परिस्थितीवर मात केली तर नंतर एवढे समाधान मिळते की मनाला खुप आनंद होतो व असा आनंद नेहमी मिळवायचा असेल तर बिघडलेल्या परिस्थितीवर थोड्या समयने मात करावी म्हणजेच आपल्याच परिक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचे आहे.आपल्याच लढाईत आपल्याला जिंकायचे आहे .तुका म्हणे आम्हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग.ते खरंच आहे असे युद्धासारखे प्रसंग अनेक वेळा आपल्यापुढे निर्माण होतात त्यावर थोडा समयने कशी मात करता येईल हे शिकुन घ्यावे.त्यावेळी शांत राहाणे म्हणजे माघार नसते तर आपल्या मनावर मिळवलेला तो विजय असतो. काही चांगल्या लोकांचे उच्चारलेले दोन चांगले शब्द आपले जीवन बदलू शकतात .चला मग आतापासून आपण थोडा समयने आलेल्या वाईट परिस्थितीवर  मात करू या व आपल्याला ते जमेलच असा प्रयत्न करु या
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...