Skip to main content

दोन गडू

दोन गडू
जीवनात आपल्याकडे नेहमी दोन गडू असतात त्यापैकी कोणत्या गडूची निवड करायची ते आपल्य हाती आहे .त्या गडूंची संपूर्ण माहीती  आपल्याला माहीत झाली की मग प्रश्नच उरत नाही .हे गडू माणसाला फसवतात व माणूस फसतो कारण हे गडू दिसायला आकर्षक असतात पण त्यात बाहेर एक लिहिले असते त्याच्या उलट आतमध्ये असते.एका गडूवर सुख लिहिलेले असते व आत राग, द्वेष, मत्सर फसवेगिरी , शिव्यागाळ, मारामारी , व्यसने ,गुंडगिरी,वासना अशा वाईट गोष्टींचा खजिना भरलेला असतो व अशा गोष्टी केल्याने काहींना असूरी आनंद मिळतो व तेच सुख आहे असे त्यांना वाटते म्हणून परत परत लोक त्याच गोष्टी करत असतात व त्यातून सुख प्रारंभीला त्यांना जाणवते पण सुखाचा तो आभास असतो व अंतिम, माणसाच्या पदरी दु:ख मिळते व हे सुख नसून दू:ख आहे व हा गडू सुखाचा नसून दु:खाचा आहे याची जाणीव होते पण हे समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.दुसरा गडू असतो त्यावर दु:ख लिहिलेले असते व आत त्याग प्रेम करुणा शांती दया परोपकार पुण्य दान सेवा हे सर्व आत भरलेले असते पण माणूस सहसा या गडूकडे बघत नाही .वास्तविक जरी या गडूवर दु:ख लिहिलेले असले तरी आत भरलेला खजिना ज्याला सापडला  व त्याचा जीवनात उपयोग केला तर सुखाच्या राशी हजर होतात .ते सुख घेण्यासाठी त्याची ओंजळ अपूर्ण पडते .माणसाने ठरवायचे कोणता गडू घ्यायचा .पहिला गडू घेतला की सुरवातीला सुख वाटते पण अंतिम दु:ख येते व दुसरा गडू घेतला तर सुरवातीला दु:ख वाटते पण नंतर सुखच सुख असते .ज्याने हे अनुभवले तो आपल्याला हवा असणाराच गडू निवडणार .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...