ओळख
ओळखीने होतो बराच फायदा
न होणारे काम होते सहजच
पैशांपेक्षा ओळख असते महत्वाची
ओळख ठेवावी चांगल्या माणसाशीच
वाईट वृत्तीच्या माणसांशी
ओळख ठरते अडचणींची
जीवनात येतात त्यामुळे धोके
म्हणून अनोळखच बरी असते त्यांची
ओळख टिकून राहते
समान विचार असणार्या व्यक्तींची
प्रगतीही होते चांगली
त्यांच्याशी जवळीक असण्याची
ओळखीचे रुपांतर होते
संबंध मजबूत होण्यासाठी
योग्य अंतर राखून
टिकतात संबंध संपूर्ण जीवनासाठी
प्रत्येक माणसाची असते
समाजामध्ये एक ओळख
माणूस जरी निघून गेला
तरी मागे ठेवून जातो ओळख
ओळखीचा गैरफायदा घेणारे
भरपूर लोक असतात
दुसर्याची ओळख सांगून
कधीही लूबाडू शकतात
लोक स्वत:पेक्षा ओळखतात
दुसर्याला नेहमी जादा
आपल्यात कमतरता असूनही
दुसर्यात शोधतात सदा
ओळखीत असेल जर स्वार्थ
ती ओळख संपते एकदिवशी
असेल ओळखीत प्रेमाचा ओलावा
भेटावे वाटते दरदिवशी
व्यक्ती जरी बरोबर असला
तरी ओळखणे असते कठीण
एखादा प्रसंग जेव्हा घडतो
तेव्हा बाहेर पडते खरेपण
व्यक्ती नसते स्वत:ला ओळखत
जाते संपूर्ण जीवन निघून
मात्र दुसर्याला ओळखण्यातच
घालवतात वाया जीवन
माणसाने प्रथम स्वत:ला ओळखावे
हेच ध्येय जीवनाचे असावे
आत जो आहे बसलेला
त्याला पूर्णपणे ओळखावे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment