Skip to main content

बदल

बदल
माणसाने मनापासून ठरवले की बदल हा त्याच्यात करता येतो.एखादी चुकीची गोष्ट अंगवळणी पडली की ती व्यसन बनते .काही केल्या तरी ती गोष्ट सूटत नाही.माणसाने ती सोडण्याचा प्रयत्न केला तरी   मन हे सोडायला तयार नसते व ती गोष्ट करायला मन जबरदस्ती करते .मनाचा असा हा कणखरपणा मोडणे फार कठिण असते त्यासाठी मनाविरुद्ध बंड पुकारावे लागते  व काही दिवस हे बंड चालूच ठेवावे लागते तेव्हा कुठेतरी मन त्या गोष्टीपासून माघार घेते व ती गोष्ट सुटते व नंतर तेच मन  त्या गोष्टीचा तिरस्कार करायला लागते .ज्याला बदल आत नको असतो तो कितीही तिर्थस्थानी फिरला .कितीही पदयात्रा केलीत.त्याच्यासमोर परमेश्वर उभा राहिला तरी त्याच्यात बदल होणे शक्य नाही पण त्या मार्गावरील ज्ञान प्राप्त करुन आत बदल निर्माण झाला तर जगाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते .जे इतर लोकांना दिसते किंवा इतर लोक एखाद्या गोष्टींबद्दल जे विचार करतात त्यापेक्षा वेगळे विचार याच्या डोक्यात चालू असतात .जग जसे इतरांना दिसते त्यापेक्षा वेगळे याला दिसत असते म्हणून बाहेरुन कितीही ज्ञानाचा मारा केला तरी बदल शक्य नाही पण तेच ज्ञान आत गेले तर मात्र माणूस संपूर्णपणे बदलून जातो व तो कुठेही गेला तरी वरवर दिसणार्‍या लखलखणार्‍या गोष्टींना बळी पडत नाही कारण आतून त्याने वेगळीच पातळी गाठलेली असते व त्या पातळीमुळे क्षणभर दिसणार्‍या मनाला भूरळ पाडणार्‍या गोष्टींमुळे तो विचलित होत नाही असा आतून बदल विवेकानंदामध्ये झाला .अनेक संतामध्ये झाला .बाहेरुन दिसतांना जाणवणार नाही पण आतून पूर्ण वैराग्य स्थितीला प्राप्त झालेले असतात . जसे डोळ्यावर हिरवा चष्मा घातला की जग हिरवे दिसते तसेच यांचा आतील चष्मा ज्ञानाने बदलून गेलेला असतो व त्यामुळे जग हे नेमके कसे हे त्यांना दिसत असते ते इतरांना नाही दिसत व जग कसे दिसते हे कितीही सांगितले तरी लोकांना खरे वाटत नाही .जोपर्यंत आतील स्वत:चा चष्मा बदलत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही स्वत:ला .जोपर्यंत स्वत:ला अनुभव येत नाही तोपर्यंत जग असे दिसते यावर विश्वास बसत नाही व हसण्यावारी आपण तो विषय घेऊन सोडून देतो.आतुन पोहचलेले लोक लोकांत असतात तरी आनंदी असतात व एकांतवासात ही आनंदी असतात कारण आत त्यांना त्यांच्या सख्याची भेट झालेली असते व एकदा का आतील रंग लागला तर बाहेरच्या रंगाची उधळण नकोसी वाटते.बदल हा फक्त आत ज्ञान जाऊनच होतो .काही माणसे कानाने ऐकलेले ज्ञान दुसर्‍या कानाने सोडून देतात व जीवनभर भरपूर ज्ञान ऐकून भरपूर पदयात्रा करुन शेवटी कोरा तो कोराच राहतात चांगदेवासारखे .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...