Skip to main content

दिव्याखाली अंधार

दिव्याखाली अंधार,
साधारपणे असे बोलले जाते की दिव्याखाली अंधार.दिवा सगळीकडे प्रकाश देतो पण त्याच्या खाली अंधार असतो.काही माणसांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते.आपले लोक आपल्याशी नीट वागत नाहीत बोलत नाही पण दुसर्‍याला मदत करण्यासाठी मात्र सतत पुढे असतात .दुसर्‍याच्या मनात त्यांची प्रतिमा एकदम छान असते पण आपल्या माणसांशी तुसडेपणाने वागतात .मदत तर राहिली दूर पण व्यवस्थित बोलत पण नाही पण दुसर्‍यांना त्यांना वेळ द्यायला त्यांच्याकडे कोणतेही कारण नसते पण आपल्या माणसांसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो .ज्यांच्यामुळे आपण एक मुक्काम हासिल केलेला असतो त्याच माणसांसाठी सर्व हिशोब असतो पण परक्यासाठी कोणताही हिशोब नसतो .दुसर्‍यांना दिलेले वचन वेळेत पूर्ण करणार पण आपल्या माणसांना दिलेले वचन विसरतात त्यामुळे कोणतीही व्यक्ती बाहेरच्या लोकांसाठी देव असते पण घरातल्या लोकांसाठी ती दानव ही असू शकते.एखादी व्यक्ती आपल्या बायकोला नीट वागवत नाही ,मुले आईवडिलांना विचारत नाही,आईवडिल मुलाला किंमत देत नाहीत,बायको नवर्‍याला मानसन्मान देत नाही पण दुसर्‍या माणसांना असे दाखवतात की बघा मी किती चांगला माणूस आहे पण घरच्यांनाच माहीत असते की ही व्यक्ती काय चीज आहे म्हणून प्रथम माणसाने आपल्या माणसांशी चांगले वागावे .काही वेळा आपल्या माणसांचे स्वभाव विचित्र असतात व त्यामुळे बाहेरचे लोक परवडले असे वाटायला लागते .काही माणसे बाहेरच्या लोकांनी काहीही सांगितले तरी विश्वास ठेवतात पण आपल्या माणसांवर नाही .काही अंशी ते बरोबर निघते तर काही वेळा बाहेरचे लोक आपल्यात फूट पाडण्यासाठी असे कारस्थान करत असतात.  आपल्या माणसांचे अपराध आपण पोटात घातले की बरेच प्रश्न सुटतात व त्यासाठी मोठे मन करायची वृत्ती लागते तसेच आपल्या माणसांकडून अवास्तव अपेक्षा आपण ठेवतो व त्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग आपण दरी निर्माण करतो .दुसरी गोष्ट आपणच एकमेकांशी तुलना करतो व त्या तुलनेने आपण आपल्या मनात दरी निर्माण करतो . समाजात बघितले तर एक कळून येईल की  समाजाची सेवा करतांना घरच्यांना वार्‍यावर सोडून दिलेले आहे .काही माणसे मोठ्या पदावर आहेत पण आपल्या घरच्यांच्या साध्या गरजाही भागवू शकत नाही .स्वत:ला समाजसेवक साधूसंत म्हणणारे लोकांनी घरच्यांचा कोणताही विचार न करता आपला मार्ग निवडला म्हणून दुसर्‍यांसाठी त्यांची प्रतिमा खूप मोठी असेल पण आपल्या माणसांच्या मनातून ते पूर्णपणे उतरलेले असतात .जे सगळ्यांना समान न्याय देतात .दूसर्‍यांसाठी जेवढे करतात त्याआधी घरच्यांची तेवढीच काळजी घेतात असे माणसे फार दुर्मिळ असतात. सत्य आहे की काहीही झाले तरी दिव्याखाली अंधार हा राहणारच पण प्रयत्न करुन तो कमी नक्की होतो हे मात्र तेवढेच खरे.
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...