Skip to main content

अर्थ

अर्थ असतो नसतो

घरात नुसते हुकुम सोडणार्‍या
माणसांना अर्थ नसतो
कामांचे वाटप करुन
स्वत:ही कामं करायला अर्थ असतो 

नोकरीच्या ठिकाणी फक्त
टाईमपास करणार्‍यांना अर्थ नसतो
कामचुकारपणा न करता
कामात समर्पण करणार्‍यांना अर्थ असतो

निवडणूक लढवून फक्त
जिंकणार्‍या माणसांना अर्थ नसतो
आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे
पार पाडायला अर्थ असतो

भाषpणात टोमणेबाजी करुन
लोकांच्याl टाळ्यांना अर्थ नसतो
लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी
काय करतात त्याला अर्थ असतो

रिटायरमेंटचे दिवस  मोजतांना
काम करायला अर्थ नसतो
चेहर्‍यावर प्रसन्नता ठेऊन
 दिवस आनंदात जायला अर्थ असतो

दुसर्‍याचे दोष काढण्यात
वेळ घालवायला अर्थ नसतो
स्वत:चे दोष शोधून
ते दूर करायला अर्थ असतो

मिळालेले पद नुसते
मिरवायला अर्थ नसतो
त्या पदाला योग्य न्याय 
द्यायला अर्थ असतो

नाते आहे असे म्हणायला
काहीही अर्थ नसतो
ते नाते टिकविण्याच्या
प्रयत्नांना अर्थ असतो

मित्र व्यसनी आहे
असे म्हणायला अर्थ नसतो
त्याला व्यसनातून मुक्त करण्याच्या
उपायांना अर्थ असतो

वाममार्गाने पैसे कमवायला
काहीही अर्थ नसतो
कष्टाने ,प्रामाणिकपणे कामं करुन
पैसे मिळवायला अर्थ असतो

जीवन आहे क्षणभंगूर
याचे स्मरण न ठेवायला अर्थ नसतो
आपण आहोत पृथ्वीवरचा पाहूणा
याचे भान राहायला अर्थ असतो

किती वर्ष जगलात
याला अर्थ नसतो
लोकांच्या उपयोगी किती आलात
त्याला खूप अर्थ असतो

मरण येत नाही म्हणून
नुसते जगायला अर्थ नसतो
किर्ती होणार असेल तर
जन्म घ्यायला अर्थ असतो

प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...