गड्या आपुला गावच बरा
लहाणपणी वाटायचे शहराचे
मनाला फार आकर्षण
निसर्ग होता एकदम जवळ
पण शहराकडे धावत होते मन
शहराकडून येणार्या माणसांकडे
बघायला खूप वाटायचा हेवा
आपणही यांच्यासारखे बनून
वाटायचे खावा सुखाचा मेवा
शहरातील माणसांकडे भरपूर पैसा
पायात बूट डोळ्यांवर चष्मा दिसायचा
आपणही असे कधीतरी असू
असे स्वप्न बघत रात्रंदिवस जायचा
पायी पायी चालतांना
शहरातील चारचाकीं मनात भरत होते
आज चारचाकी स्वत:ची असतांना
पायी चालायची मजा वाटते
आज सर्वकाही मिळाले
जे बघितले होते स्वप्न
पण आकर्षण नाही वाटत
जे धावत होते लहाणपणी मन
आज वाटत आहे मला
आपुला गावच आहे बरा
शुद्ध हवा नैसर्गिक वातावरण
हे मिळत नाही शहरा
जेथे बघावी गर्दीच गर्दी
बघून जीव गुदमरतो
मग येते गावाची आठवण
सांगतो सुट्टीत जाऊन येतो
जे मिळत होते लहाणपणी
ते मिळत नाही शहरी
त्यावेळी वाटत नव्हती किंमत
आज जाणवते भारी
प्रत्येकाला असावे गाव
शुद्ध हवा घेण्यासाठी
गावात असावे स्वत:चे घर
शांत विसावा घेण्यासाठी
लहाणपणी दिसत नव्हता पैसा
पण सुखाच्या होत्या राशी
आज आहे मुबलक पैसा
पण सुखासाठी फिरतात गयाकाशी
ज्याला आहे गाव
तो आहे खरा भाग्यवान
त्याचे शरीर असते शहरी
पण गावी धावत असते मन
गावाची किंमत वाटण्यासाठी
गावापासून असावे काही दिवस दूर
पण गावी परत येतांना
गावाचा रस्ता संपत नाही लवकर
लहाणपणी खेळलेले दिवस
आठवणी देत राहतात
कुटुंब व मित्र यांच्या बरोबरचे क्षण
कधीच नाही विसरता येत
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment