सुख प्रत्येक माणूस सुखासाठी झटत असतो पण सुख म्हणजे नेमके काय हेच माहीत नसते .बर्याच जणांना वाटते हाती भरपूर पैसा बंगला गाड्या नोकर चाकर म्हणजे सुख व ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात .काहींना वाटते हाती मोठे पद म्हणजेच सुख . काहींना वाटते आपली मुलेबाळे व्यवस्थित मार्गाला लागले म्हणजे सुख.म्हणजे मोठमोठ्या गोष्टीत सुख पाहिले जाते पण जेव्हा स्वत:च्या शरीराला हानी पोहचते की जी जीवावर बेतणारी असते .अतोनात यातना होतात की ज्या सहन करण्या पलिकडच्या असतात तेव्हा माणूस आपल्या जवळ असलेले किंवा मिळवलेले घर बंगला गाडी नोकर चाकर पती पत्नी मुले बाळे पद हे सर्व विसरतो व ज्या यातना होता आहेत त्या कशा बर्या होतील व त्या बर्या व्हाव्यात व त्या यातनांतून सुटका व्हावी अशी अपेक्षा असते व त्या यातनातून सुटका झाली की सुख अशी भावना तयार होते पण जेव्हा यातना नव्हत्या तेव्हा मात्र इतर गोष्टींमध्ये सुख शोधत असतो पण यातना सुरु झाल्या की मृगजळाप्रमाणे बाकी गोष्टी विसरतो व आपल्याला बरे वाटेल यातनांतून ते खरे सुख असे वाटायला लागते म्हणून सुख म्हणजे नेमके काय हे माणसाला समजले की मग बरेच प्रश्न आपोआप सुटतात ...