Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

साकडे वाठ्

विठ्ठलाला साकडे का उभा विठ्ठला विटेवरी हात कमरेवर ठेवून कोरोनाने मांडला कहर जरा बघ विटेवरुन उतरुन जगाचा स्वामी म्हणून म्हणतात भक्ताचा कैवारी आहे तू आज का म्हणून गप्प उभा थोडी दया दाखव रे तू पुंडलिकासारखी सेवा करतात डाॅक्टर पोलीस नर्सेस हे तू बघत असशीलच तरी का नाही धावून येतोस जगाचे सर्व व्यवहार थांबले तुझी मंदिरेही झालीत बंद तरी तू मौन धरिले दे आम्हांला परत आनंद काहीतरी चमत्कार करून दाखव तुझे अस्तिव तुझ्या नामाचा जप चालला येऊ दे जनाची तुला कीव संपूर्ण जगातून कोरोनाला गाडून टाक खोल खड्ड्यात धर त्याची गचांडी कर त्याचा पूर्ण निप्पात एवढाश्या विषाणूने मानवाला घरात राहायला भाग पाडले तुझ्या पायाखाली चिरडून कानी पडू दे तू त्याला संपवले तुझ्याशिवाय कुणाकडे आम्ही जाऊ रे  दयाळू नारायणा आम्ही सारी तुझी लेकरे संसार पडला सूना सुना बस झाले तुझे विटेवर उभे राहणे कुणाच्या रुपात येऊन घे व्रत कोरोनाला मारणे सोड तुझे सुदर्शन जसे शिशुपालाला मारले याचेही पापं झालीत कधीच शंभर कर धड याचे वेगळे प्रा. दगा देवरे

चिंता आणि चिता

चिंता आणि चिता चिंता आणि चिता यामध्ये फरक आहे फक्त टिंबाचा चिंता जाळते आतून  चिता जाळते प्रत्येक भाग शरिराचा चिंतापेक्षा चिता असते  कैकपटीने चांगली चिंता जाळते रोज चिता जाळते एकाच वेळी चिंतेने माणूस रोजच मरतो अनेक समस्या घेऊन चिता जेव्हा जाळते माणूस असतो पडलेला मरुन चिंता किती करावी हे असते माणसाच्या हाती चितेने जाळावे हे असते आपण सोडून दुसर्‍याच्या हाती चिंता जो करतो तो जीवंत असूनही मेलेला चिता जे करत असते ते कधीच समजत नाही माणसाला चिंता असेल किंवा नसेल हे ठरवावे माणसाने पण चिता असते प्रत्येकाच्या नशिबी हे कायम लक्षात ठेवावे प्रत्येकाने चिंता जेवढी जास्त केली तेवढी चिता येते लवकर चिंता आणि चिता आहेत बहिणी जात नाहीत त्या एकमेकांपासून दूर प्रा. दगा देवरे

राया

राया राया मला नको दागदागिने नको मला भारीची कोणती साडी आणून द्या मला साधी भाजी त्यातल्या त्यात हवी मेथीची एक जुडी नका मला कुठे फिरायला नेऊ नको जाऊ कोणत्या हाॅटेलमध्ये घरातच आपण राहू दंग होऊ या प्रेमाच्या गप्पांमध्ये राया मला नको गाडी बंगला नको कोणते नोकर चाकर तुम्हांला घरीच खाण्यासाठी देते मी छान ठेचा भाकर राया मला नको तूप लोणी हवं मला साधे वरणभात नको मला पुरणपोळी करायची आहे फक्त तुमच्याशी खूप बात राया मला नको काही जीवनात हवे तुमच्या बरोबर आयुष्य भरपूर वाटते मला आयुष्याची किंमत नको जाऊ आपण एकमेकांपासून दूर प्रा. दगा देवरे

तू

.तू माणसा कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कोरोनाच्या भीतीने स्वत:ला कोंडून घेतलेस तू अंतराळात भरार्‍या मारणारा तू चंद्रावर पाऊल ठेवणारा तू न दिसणार्‍या विषाणूमुळे घरात डांबून घेतलेस तू अनेक मिसाईलस निर्माण करणारा तू सारखा दुसर्‍या देशावर आक्रमण करणारा तू तुझ्याच देशात हतबल झालास तू लसीसाठी प्रयत्न करतोय तू सारखा परदेश वार्‍या करणारा तू घरात कधीच न बसणारा तू कोरोनामुळे  परेशान झालास तू घराच्या बाहेर  आता पाऊल न ठेवणारा तू घरच्यांचे कधीच न ऐकणारा तू कायम भिंगरी बांधून फिरणारा तू मित्रांच्या नादी लागणारा तू आता निमुटपणे बसलाय तू तंबाखू सिगारेट ओढायचा तू दारूशिवाय न राहायचा तू आता गरम पाणी पित बसलाय तू असा कसा बदल केलास तू बाहेर प्रदुषण करायचा तू गाड्या भरपूर उडवायचा तू आता जमिनीवर आलास तू परमेश्वराचे नाव घ्यायला लागलास तू पैशांसाठी काहीही करायचा तू त्यासाठी कोणत्याही थराला जायचा तू आता जीवनाची किंमत करतोस तू खातो आता चटणी भाकर तू बाहेरचे नेहमी खाणारा तू घराच्या जेवणाला नावे ठेवणारा तू आता जे येईल ते खाणारा तू घरातले कामं करणारा तू असा कसा बदलला तू काही दिवस असाच घरात बस तू ब...

कोरोना

फक्त घरी बसायचं पोलीसांना पडावं लागत घराबाहेर आपली कामगिरी बजावण्यासाठी आपल्या पोराबाळांपासून दूर राहून झटतात ते आपल्यासाठी डाॅक्टर नर्सेस घालतात  आपला जीव धोक्यात करतात रूग्णांची सेवा जरी नसेल त्यांच्या आवाक्यात घरी बसणे हिच आपली समाजासाठी सेवा समजावी काहींना ते ही नाही जमत आपण त्यांना शिस्त ही शिकवावी सफाई कामगार करतात साफसफाई सगळीकडे निदान घरी बसल्या बसल्या आपण लक्ष द्यावे घरातल्या कचर्‍याकडे बातम्यावाल्यांचा घसा बसला घरीच थांबा असे सांगून सांगून लोकांच्या कानी नाही पडत गर्दी करतात अफवांवर भरवसा ठेवून घरी बसून बरंच काहीतरी करण्यासारखे असते डोळे उघडे ठेवले तर बरंच शिकण्यासारखे असते एकांतात बसून करावी आपली आपल्याशीच ओळख शिकून घ्यावी आपण ओळख करण्याची मेख राग द्वेष मत्सर करता करता आयुष्य घातले आपण खर्ची आपल्या आतील परमेश्वराची कधीच राखली नाही आपण मर्जी भौतिक जग आहे भ्रम सत्य आहे आपल्यातील भगवान एक याची जाणीव व्हावी प्रत्येकाला सबका मालिक आहे एक माझ्यामुळेच चालते सारे हा व्हावा भ्रम दूर विश्वापुढे मी आहे थोकडा याची जाणीव झाली तरी भरपूर धावत होतो आपण पैशांसाठी रात्रंदिवस आपण आहोत कोण ...