आत्मविश्वास बडी चीज होती है बाबू माणसाला कोणतेही काम यशस्वीपणे करण्यासाठी आत्मविश्वास असावा लागतो .हा आत्मविश्वास का डळमळतो त्याचे प्रथम कारण म्हणजे शरीर.जोपर्यंत शरीर तंदूरुस्त आहे तोपर्यंत लाथ मारील तेथे पाणी काढील असा आत्मविश्वास असतो पण जेव्हा शरीराच्या तक्रारी चालू होतात उदा. एखाद्याला कॅन्सर झाला ,अपघाताने शरीराचे अवयव निकामी झालेत पॅरालेसीस झाला, हार्टअॅटेक येऊन गेला डोळ्यांचे आजार किडनीचे आजार मेंदूचे आजार असे लवकर बरे न होणारे आजार जेव्हा जडतात तेव्हा भरपूर आत्मविश्वास असणार्या माणसांचा आत्मविश्वास संपतो .लाथ मारील पाणी काढणार म्हणणारे लोक दैनंदिन स्वत:चे कामही करु शकत नाही .पूर्ण आत्मविश्वास गमावून बसतात .त्यातच काही मार्ग काढतात व पुन्हा उभे राहतात पण ते प्रमाण क्वचितच दिसते.दुसरे कारण म्हणजे ज्या माणसांवर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच माणसांनी धोका दिला तर माणूस आत्मविश्वास गमावून बसतो त्याचप्रमाणे ज्या माणसांवर आपण प्रेम करतो ,ती व्यक्ती म्हणजे आपले जीवन ,जे जगतो त्या व्यक्तीसाठी व अशी व्यक्ती जेव्हा जग सोडून जाते तेव्हा कुणासाठी जगावे,कुणाकडे पाहून जगावे या विचारांमु...