Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

काॅलेजचे कामं

काॅलेजचे कामं आपल्या काॅलेजचे कामं अतिशय नियोजन पद्धतीने चालू आहेत.online lects असो कीoffline lects  असो कुठेही गोंधळ झालेला दिसला नाही  कोरोना काळात अनेकदा timetables बदलले .पण कुठेही विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला दिसला नाही.परिक्षाही वेळेवर online आपण घेत आहोत.room nos चा problem असूनही त्यातून मार्ग काढत आपण चांगले कामं करतो आहोत .12वीचे पण सर्व pract. घेतले,वेळेवर portion cimplete झाला तसेच अकराविचे पण pract.maximum घेत आहोत वportion complete करण्यासाठीही प्रयत्नकरतो आहोत याचे श्रेय exam committee तसेचvice principal supervisor coordinators आणि  सर्व  शिक्षकांना जाते.नवीन शिक्षकांनीही खूप साथ दिली एक अपवाद.असे नियोजनबद्ध काम करतांना सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केले त्यामूळे काम करतांना सर्वांना हूरुप येतो .जोगळेकर मॅडम व गोईल मॅडम यांनी आपल्या पदांना योग्य न्याय देतांना दिसत आहेत.घरच्या अडचणींवर मात करुन काॅलेजच्या कामात सर्वजण मोलाचे सहकार्य करत आहेत .आपण वआपले काम भले अशी भूमिका सर्वांनी घेतल्यामुळे दुसर्‍या dept मध्ये हस्तक्षेप कुणीही करतांना दिसले नाही.शेवटी का...

जीवन एक खेळ

जीवन एक खेळ जेव्हा ठरवतो कुठे जायचे येतो अचानक अडथळा सर्व नियोजन डळमळते कितीही पाळली वेळा आपण केव्हा कुठे असू हे आपल्याला सांगता येत नाही आलेल्या परिस्थितीशी हतबल होऊन त्यातून बाहेर पडायला होत नाही नियोजित कामावर नाही जाता आले तर संताप भरतो मनी काय ठरवले व काय झाले हे सांगायला नसते कुणी मनासारखे नाही झाले तरी मन शांत ठेवावे मौन धारण करुन परिस्थितीवर मात करायचे ठरवावे काहीतरी आपल्याकडून चांगले घडावे यासाठी देवाने केला आजचा दिवस बहाल त्यामुळे दु:खी कष्टी न होता मनात रचावा आनंदाचा महाल दुसरा दिवस काय घेऊन येणार हे आपल्याला नसते माहीत गर्व अहंकार न बाळगता आतून रहावे नेहमी शांत ठरवलेले काम नाही झाले तरी करु नये आपण त्रागा कुणाच्या तरी मनासारखे होत आहे हे सांगतो तुमचा हितचिंतक दगा चांगले बोलता येत नसेल तर वाईट शब्द नको तोंडी आपल्यालाच होतो त्रास कारण वेगात चालते आपली नाडी नकारात्मक विचार करण्याने माणसाच्या ह्रदयावर येतो दाब धडधाकट दिसणार्‍या माणसाच्या ह्रदयाला देव म्हणतो आता थांब घरदार जमीन जुमला यासाठी चढू नये कोर्टाची कधी पायरी प्रत्येक दिवशी जीवन चालले सरत म्हणून वेळ वाया नको कुणाच्या दार...

खरी संपती

खरी संपती आज माणूस जो तो संपती कमविण्याच्या मागे लागला आहे .पैसा कुठून कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो आहे .कुणी किराणा मालाचे दुकान टाकतात, कुणी खते बियाणे यांचा व्यवसाय, कुणी विविध मालाचे दुकान टाकतात, कुणी हाॅटेल टाकतात, कुणी व्यवसाय करतात, कुणी नोकरी करतात असे अनेक प्रकारे कुणी प्रामाणिकपणे पैसे कमवितात तर कुणी दुसर्‍याला लुबाडून पैसे कमवितात .कुणाकडे प्रचंड पैसा आहे. कुणाकडे घरे आहेत जमिनजुमला आहे पण हे सर्व करत असतांना खर्‍या संपतीकडे माणसाचे लक्षच नाही .पैसा कमविण्याच्या नादात वेळेवर जेवण नाही, विश्रांती नाही, पुरेशी झोप नाही त्यामुळे काहींचे वजन भरपूर वाढले ,काहींना वजनच नाही. काहीचे पोट सुटले. काहींना पोटच नाही अशामूळे काहींना उठता येत नाही. उभे राहता येत ना. मांडी घालून बसता येत नाही .चालतांना धाप लागते. blood pressure साठी गोळ्या खाव्या लागतात .पचन होत नाही म्हणून औषधे खावे लागतात .बॅंकेत भरपूर पैसा आहे व तो कमविण्याच्या नादातच असे सर्व रोग पाठीमागे लागलेत .कधी हार्ट फेल होईल सांगता येत नाही. कधी कोणता झटका येईल सांगता येत नाही .जो पैसा कमविला जी संपती कमविली ती जागीच राहणार व...

गड्या आपुला गावच आहे बरा

गड्या आपुला गावच बरा लहाणपणी  वाटायचे शहराचे मनाला  फार आकर्षण निसर्ग होता एकदम जवळ पण शहराकडे धावत होते मन शहराकडून येणार्‍या माणसांकडे बघायला खूप  वाटायचा हेवा आपणही यांच्यासारखे बनून वाटायचे खावा सुखाचा मेवा शहरातील माणसांकडे भरपूर पैसा पायात बूट डोळ्यांवर चष्मा दिसायचा आपणही असे कधीतरी असू असे स्वप्न बघत रात्रंदिवस जायचा पायी पायी चालतांना शहरातील चारचाकीं मनात भरत होते आज चारचाकी स्वत:ची असतांना पायी चालायची मजा वाटते आज सर्वकाही मिळाले जे बघितले होते स्वप्न पण आकर्षण नाही वाटत जे धावत होते लहाणपणी मन आज वाटत आहे मला आपुला गावच आहे बरा शुद्ध हवा नैसर्गिक वातावरण हे मिळत नाही शहरा जेथे बघावी गर्दीच गर्दी बघून जीव गुदमरतो मग येते गावाची आठवण सांगतो सुट्टीत जाऊन येतो जे मिळत होते लहाणपणी ते मिळत नाही शहरी त्यावेळी वाटत नव्हती किंमत आज जाणवते भारी प्रत्येकाला असावे गाव शुद्ध हवा घेण्यासाठी गावात असावे स्वत:चे घर शांत विसावा घेण्यासाठी लहाणपणी दिसत नव्हता पैसा पण सुखाच्या होत्या राशी आज आहे मुबलक पैसा पण सुखासाठी फिरतात गयाकाशी ज्याला आहे गाव तो आहे खरा भाग्यवान त्याचे शर...

अर्थ

अर्थ असतो नसतो घरात नुसते हुकुम सोडणार्‍या माणसांना अर्थ नसतो कामांचे वाटप करुन स्वत:ही कामं करायला अर्थ असतो  नोकरीच्या ठिकाणी फक्त टाईमपास करणार्‍यांना अर्थ नसतो कामचुकारपणा न करता कामात समर्पण करणार्‍यांना अर्थ असतो निवडणूक लढवून फक्त जिंकणार्‍या माणसांना अर्थ नसतो आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायला अर्थ असतो भाषpणात टोमणेबाजी करुन लोकांच्याl टाळ्यांना अर्थ नसतो लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय करतात त्याला अर्थ असतो रिटायरमेंटचे दिवस  मोजतांना काम करायला अर्थ नसतो चेहर्‍यावर प्रसन्नता ठेऊन  दिवस आनंदात जायला अर्थ असतो दुसर्‍याचे दोष काढण्यात वेळ घालवायला अर्थ नसतो स्वत:चे दोष शोधून ते दूर करायला अर्थ असतो मिळालेले पद नुसते मिरवायला अर्थ नसतो त्या पदाला योग्य न्याय  द्यायला अर्थ असतो नाते आहे असे म्हणायला काहीही अर्थ नसतो ते नाते टिकविण्याच्या प्रयत्नांना अर्थ असतो मित्र व्यसनी आहे असे म्हणायला अर्थ नसतो त्याला व्यसनातून मुक्त करण्याच्या उपायांना अर्थ असतो वाममार्गाने पैसे कमवायला काहीही अर्थ नसतो कष्टाने ,प्रामाणिकपणे कामं करुन पैसे मिळवायला अर्थ असतो जीवन आ...

मकरसंक्रात

मकरसंक्रात मकरसंक्रातीच्या देतो आज तुम्हांला खूप खूप शुभेच्छा पूर्ण होवो तुमच्या मनातील सर्व इच्छा तिळ तिळने  बनतो लाडू  छान छान गोड शब्दाने बनते  नातं महान गुळाने चिकट राहतो एक एक तिळ विश्वासाचे नाते बनायला लागतो मात्र वेळ तिळगूळ  प्रेमाने एकमेकांना आजच्या दिवशी द्यावा एकमेकांवरचा जुना नवा राग  कायमचा मिटवून  टाकावा आज सूर्याचा होतो  मकर राशीत प्रवेश आपलेही जीवन व्हावे इतरांसाठी नेहमी आदर्श आजपासून बोलावे सर्वांशी  आदर व प्रेमाने हसून स्वागत करावे  एकमेकांचे आनंदाने गुळासारखा लवचिकपणा आपल्या स्वभावात यावा आपला इतरांना नेहमीच आधार वाटत रहावा गूळ म्हणजे प्रेमळ शब्द तिळ म्हणजे मित्रमंडळी व नातलग मोठं गुळासारखे चिकटून करावे आपसातले नाते घट्ट तिळ अन् गुळाचा गोडवा यावा  आपल्या शब्दांमध्ये शब्द उच्चारताच आनंद फुलावा सतत  दुसर्‍याच्या मनामध्ये संक्रांत यावी आपल्याला  चिकटलेल्या दुर्गुणांवर घेऊन जावे तिने त्यांना  खूप दूरवर देवरे सर

आहे व होता

आहे व होता आहे म्हणजे वर्तमानकाळ जीवंत असल्याचा पुरावा होता म्हणजे भूतकाळ आता नसल्याचा सांगावा जीवन म्हणजे काय आहे व होता यातील अंतर काहींचे अंतर संपते न कळायच्या आधी तर काहींचे संपत नाही लवकर आहेत असतात कामाच्या धावपळी कधीच न थांबणार्‍या होतात सर्व संपते काहीच खर्‍या नसणार्‍या हे सांगता येत नाही आहेचे कधी होईल होता आहे मध्ये करावे चांगले काम कुणाचाही बदला न घेता आहे म्हणजे असतो इतरांना भक्कम आधार होता म्हणजे करतो बाकींना कायमचे निराधार आहेमध्ये नसते माणसाला देत कुणी किंमत होता मध्ये जाणवते इतरांना त्याची किंमत आहे जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आनंदी रहावे होता मध्ये माहीत नसते पुढे काय होत असावे आहे मध्ये क्षणभर लोभासाठी होता मध्ये होऊ नये रुपांतर विचारपूर्वक पाऊल उचलून लोभापासून रहावे कायमचे दूर आहे मध्ये असतो आपला परिवार सर्व सुखदु:खामध्ये वाटेकरी होतामध्ये नसतो कुणी आपल्याजवळ एका देवापरी देवरे सर

वास्तव

वास्तव नेहमीचा येतो पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा महापूर , दुष्काळ आणि महागाई याने बसतात सगळ्यांना झळा किती आलेत अन् गेलेत  याची कोणतीच गणती नाही जगरहाटी अशीच राहणार चालू यात कोणताही बदल होणे नाही कितीही असेल माणूस श्रीमंत त्याला एक दिवशी जावेच लागणार चिंता नसावी कुणाला त्याची जागा कुणीतरी घेणार जग आहे एक रंगभूमी आपण आहोत एक कलाकार चांगली भूमिका साकारण्यासाठी बघू नये कोणता आपण वार माणूस आहे काही दिवसांसाठी पृथ्वीवर आलेला पाहूणा स्वत:ला मालक समजून म्हणू नये मीच आहे फक्त शहाणा वेळ वाया घालवू नये कोणत्याही वादविवादात आयुष्य आहे मोजके याचे भान असावे ध्यानात आजचे काम उद्यावर नको उद्या येईलच याची नाही शाश्वती आळस झटकावा त्यासाठी उजळेल तुमची कांती नको कोणत्या भूतकाळातील  वाईट गोष्टींना उजाळा भविष्यांची नको तेवढी चिंता वर्तमान करावा आपला भला कुणी नसतो छोटा नसतो कुणी मोठा सगळेच आहेत जाणारे कशाला करावा जास्त आटापिटा चेहरा ठेवावा नेहमी हसरा दृष्टिकोन त्यासाठी बदला मालकाचा चालू आहे कॅमेरा याचे स्मरण असू द्यावे आपल्याला वस्तू व माणसांमध्ये जास्त गुंतू नये मनी झाला त्यांच्यात बिघाड त्रास होतो ...