Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

व्यसन

व्यसन व्यसन हे तीन प्रकारचे लोक करतात. पहिला प्रकार संसारातील अनेक संकटांनी त्याचे मन सैरभैर झाले असेल .बायको सोडून गेली असेल किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा व्यवहारात तोटा झाला असेल किंवा नोकरी गेली असेल किंवा हातून चुकीची गोष्ट झाली असेल .भाऊबंदानी छळले असेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा गरीबी पिच्छा सोडत नसेल किंवा लग्न होत नाही किंवा अपमान सहन करण्याची ताकद नसेल असे नाना प्रकारचे कारणे असतात व ते विसरण्यासाठी लोक व्यसन करतात .दुसर्‍या प्रकारचे लोक म्हणजे अतिशय श्रीमंत ,कुठे पैसा ठेवावा हे त्यांना कळत नाही म्हणून त्या पैशाचा उपयोग इकडे पार्टी कर तिकडे पार्टी कर मग अशा पार्टींमध्ये व्यसन लागते त्यामुळे अनेक श्रीमंत घराण्यातील मुले हे पैसे भरपूर असल्यामुळे वाया जातात व त्यामुळे जगण्याचे तारतम्य विसरतात .पैशाला पायाखाली तुडवतात मग हाच पैसा एकदिवस त्यांना पायाखाली ठेचतो मग ते भानावर येतात .तिसरा प्रकार म्हणजे सामान्य माणूस .वाईट मित्रांच्या संगतीला लागतात व टेस्ट म्हणून घेण्याचा मित्र आग्रह करतात व त्या टेस्टची सवय होऊन जाते मग व्यसन लागते व त्या व्यसनापायी आपलेच नाही तर संपू...

बदल

बदल माणसाने मनापासून ठरवले की बदल हा त्याच्यात करता येतो.एखादी चुकीची गोष्ट अंगवळणी पडली की ती व्यसन बनते .काही केल्या तरी ती गोष्ट सूटत नाही.माणसाने ती सोडण्याचा प्रयत्न केला तरी   मन हे सोडायला तयार नसते व ती गोष्ट करायला मन जबरदस्ती करते .मनाचा असा हा कणखरपणा मोडणे फार कठिण असते त्यासाठी मनाविरुद्ध बंड पुकारावे लागते  व काही दिवस हे बंड चालूच ठेवावे लागते तेव्हा कुठेतरी मन त्या गोष्टीपासून माघार घेते व ती गोष्ट सुटते व नंतर तेच मन  त्या गोष्टीचा तिरस्कार करायला लागते .ज्याला बदल आत नको असतो तो कितीही तिर्थस्थानी फिरला .कितीही पदयात्रा केलीत.त्याच्यासमोर परमेश्वर उभा राहिला तरी त्याच्यात बदल होणे शक्य नाही पण त्या मार्गावरील ज्ञान प्राप्त करुन आत बदल निर्माण झाला तर जगाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते .जे इतर लोकांना दिसते किंवा इतर लोक एखाद्या गोष्टींबद्दल जे विचार करतात त्यापेक्षा वेगळे विचार याच्या डोक्यात चालू असतात .जग जसे इतरांना दिसते त्यापेक्षा वेगळे याला दिसत असते म्हणून बाहेरुन कितीही ज्ञानाचा मारा केला तरी बदल शक्य नाही पण तेच ज्ञान आत गेले तर मात्र माणूस ...

ओळख

ओळख ओळखीने होतो बराच फायदा न होणारे काम होते सहजच पैशांपेक्षा ओळख असते महत्वाची ओळख ठेवावी चांगल्या माणसाशीच वाईट वृत्तीच्या माणसांशी  ओळख ठरते अडचणींची जीवनात येतात त्यामुळे धोके म्हणून अनोळखच बरी असते त्यांची ओळख टिकून राहते समान विचार असणार्‍या व्यक्तींची प्रगतीही होते चांगली त्यांच्याशी जवळीक असण्याची ओळखीचे रुपांतर होते  संबंध मजबूत होण्यासाठी योग्य अंतर राखून टिकतात संबंध संपूर्ण जीवनासाठी प्रत्येक माणसाची असते समाजामध्ये एक ओळख माणूस जरी निघून गेला तरी मागे ठेवून जातो ओळख ओळखीचा गैरफायदा घेणारे भरपूर लोक असतात दुसर्‍याची ओळख सांगून कधीही लूबाडू शकतात लोक स्वत:पेक्षा ओळखतात दुसर्‍याला नेहमी जादा आपल्यात कमतरता असूनही दुसर्‍यात शोधतात सदा ओळखीत असेल जर स्वार्थ ती ओळख संपते एकदिवशी असेल ओळखीत प्रेमाचा ओलावा भेटावे वाटते दरदिवशी व्यक्ती जरी बरोबर असला तरी ओळखणे असते कठीण एखादा प्रसंग जेव्हा घडतो तेव्हा बाहेर पडते खरेपण व्यक्ती नसते स्वत:ला ओळखत जाते संपूर्ण जीवन निघून मात्र दुसर्‍याला ओळखण्यातच  घालवतात वाया जीवन माणसाने प्रथम स्वत:ला ओळखावे हेच ध्येय जीवनाचे असावे आत ...

दिव्याखाली अंधार

दिव्याखाली अंधार, साधारपणे असे बोलले जाते की दिव्याखाली अंधार.दिवा सगळीकडे प्रकाश देतो पण त्याच्या खाली अंधार असतो.काही माणसांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते.आपले लोक आपल्याशी नीट वागत नाहीत बोलत नाही पण दुसर्‍याला मदत करण्यासाठी मात्र सतत पुढे असतात .दुसर्‍याच्या मनात त्यांची प्रतिमा एकदम छान असते पण आपल्या माणसांशी तुसडेपणाने वागतात .मदत तर राहिली दूर पण व्यवस्थित बोलत पण नाही पण दुसर्‍यांना त्यांना वेळ द्यायला त्यांच्याकडे कोणतेही कारण नसते पण आपल्या माणसांसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो .ज्यांच्यामुळे आपण एक मुक्काम हासिल केलेला असतो त्याच माणसांसाठी सर्व हिशोब असतो पण परक्यासाठी कोणताही हिशोब नसतो .दुसर्‍यांना दिलेले वचन वेळेत पूर्ण करणार पण आपल्या माणसांना दिलेले वचन विसरतात त्यामुळे कोणतीही व्यक्ती बाहेरच्या लोकांसाठी देव असते पण घरातल्या लोकांसाठी ती दानव ही असू शकते.एखादी व्यक्ती आपल्या बायकोला नीट वागवत नाही ,मुले आईवडिलांना विचारत नाही,आईवडिल मुलाला किंमत देत नाहीत,बायको नवर्‍याला मानसन्मान देत नाही पण दुसर्‍या माणसांना असे दाखवतात की बघा मी किती चांगला माणूस आहे पण घरच्यांनाच म...

विश्वास

विश्वास ठेवावा विश्वास आईबाबांवर कोणतीही शंका न घेता होईल नक्कीच कल्याण कोणताही अडथळा न येता विश्वास ठेवावा गुरुजनांनवर त्यांच्या पायापाशी बसून जीवन जगण्यासाठी उपयोगी पडेल त्यांच्याकडे असलेले ज्ञान विश्वास ठेवावा सत्यावर त्यासाठी करु नये त्रागा खोटे पडते एकदिवशी उघडे तोंड दाखवायला नसते जागा विश्वास ठेवावा आपल्या आदर्शांवर त्यांचे गुण येतील अंगी शांत मन कायम ठेवून  गुणांचा डांगोरा पिटू नये जगी विश्वास ठेवावा प्रामाणिकपणावर करावे नेमून दिलेले काम करावी निस्वार्थ मदत सगळ्यांना कोणतेही न घेता जादा दाम विश्वास ठेवावा सकारात्मक विचारांवर न होणारे होते यशस्वी काम नकारात्मक विचारांचा करावा त्याग  हवा मनाचा निश्चय त्यासाठी ठाम विश्वास ठेवावा आपल्या दैवतेवर सर्व प्रयत्न पार पाडून सफलता येईल मागे मागे करायला आपले कल्याण विश्वास ठेवावा स्वत:वर लाथ मारीन तेथे पाणी काढीन अतिआत्मविश्वास मात्र नसतो चांगला सोपे काम जाते सर्व बिघडून प्रा. दगा देवरे

दोन गडू

दोन गडू जीवनात आपल्याकडे नेहमी दोन गडू असतात त्यापैकी कोणत्या गडूची निवड करायची ते आपल्य हाती आहे .त्या गडूंची संपूर्ण माहीती  आपल्याला माहीत झाली की मग प्रश्नच उरत नाही .हे गडू माणसाला फसवतात व माणूस फसतो कारण हे गडू दिसायला आकर्षक असतात पण त्यात बाहेर एक लिहिले असते त्याच्या उलट आतमध्ये असते.एका गडूवर सुख लिहिलेले असते व आत राग, द्वेष, मत्सर फसवेगिरी , शिव्यागाळ, मारामारी , व्यसने ,गुंडगिरी,वासना अशा वाईट गोष्टींचा खजिना भरलेला असतो व अशा गोष्टी केल्याने काहींना असूरी आनंद मिळतो व तेच सुख आहे असे त्यांना वाटते म्हणून परत परत लोक त्याच गोष्टी करत असतात व त्यातून सुख प्रारंभीला त्यांना जाणवते पण सुखाचा तो आभास असतो व अंतिम, माणसाच्या पदरी दु:ख मिळते व हे सुख नसून दू:ख आहे व हा गडू सुखाचा नसून दु:खाचा आहे याची जाणीव होते पण हे समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.दुसरा गडू असतो त्यावर दु:ख लिहिलेले असते व आत त्याग प्रेम करुणा शांती दया परोपकार पुण्य दान सेवा हे सर्व आत भरलेले असते पण माणूस सहसा या गडूकडे बघत नाही .वास्तविक जरी या गडूवर दु:ख लिहिलेले असले तरी आत भरलेला खजिना ज्याला सापडल...