Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

कानावरचा द्

कानावरचा द्वारपाल आपल्या शरीराचा विचार केला तर असे दिसून येईल की डोळे बर्‍याच वेळा आपण बंद करतो .नाक असे अवयव आहे की घाण वास त्याला सहन होत नाही लगेच शिंक येते म्हणजे वाईट गोष्टी ते स्विकारत नाही .आपोआप वाईट न स्विकारणे ही त्याची सवयच आहे आपण काहीही कष्ट न करता ती क्रिया घडत असते पण कान असे इंद्रिय आहे की ते चोवीस तास उघडे असते .आपण डोळे बंद केलेत तरी कानाचे कार्य चालूच असते त्यामुळे हा हलक्या कानाचा असे म्हटले जाते .कानाने जे ऐकले ते खरेचं असते असे नाही पण ज्या भानगडी होतात त्या ह्या कानामुळेच .नको ते ऐकायचे काम कान करत असतात.चांगली गोष्ट कान उघडे असले तरी त्याच्यामध्ये शिरत नाही पण वाईट गोष्ट ऐकण्यासाठी ते आसूरलेले असतात .कुणाची निंदा अवेहलना या गोष्टी त्याला फार आवडतात व त्या गोष्टी ऐकुन तो शरीरात सोडतो त्यामुळे मनामध्ये संशय निर्माण होतो व नको त्या गोष्टी घडतात.काय ऐकावे व काय ऐकु नये ही त्याला सवय लावली तर आपला फायदा आहे. काही लोकांना चांगले भजन चांगली गाणी चांगल्या कथा कादंबर्‍या चांगल्या गोष्टी ऐकायला फार आवडतात त्यामुळे एक सकारात्मक उर्जा शरीरात तयार होते पण ज्यांना दुसर्‍याची ...

सुंदरता

सुंदरता जी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून सुंदर वाटते की सुंदर आहे म्हणून आवडते? बर्‍याच गोष्टी इतरांच्या दृष्टीने सुंदर असतात पण आपल्या दृष्टीने त्या नसतात .याउलट आपल्याला एखादी गोष्ट सुंदर वाटते पण इतरांना नाही वाटत.मग सुंदरता ही आपल्या दृष्टीवर अवलंबून असते .आपल्या आवडीवर अवलंबून असते.एखाद्याला भजनाची आवड असेल व एखादा अभंग भावरुपात बाबा म्हणत असतील तर त्या देवाच्या भक्तीने आपले डोळे भरून येतात व तोच अभंग आजच्या एखाद्या तरूणाला बोर वाटतो .त्याचे डोकं दुखायला लागते पण एखाद्या सिनेमाचे गाणे लागले तर तो मंत्रमुग्ध होतो व डोलू लागतो .आपल्याला त्याचे डोलणे व ते गाणे बोर वाटायला लागते .संताप होतो आपला म्हणून जी गोष्ट सुंदर नाही पण आपल्याला सुंदर दिसते व जी गोष्ट सुंदर आहे पण आपल्याला ती वाटत नाही या दोन्ही गोष्टी निरर्थक असतात .जी मुळातच सुंदर आहे व आपल्यालाही ती सुंदर दिसते असा मिलाप जेव्हा होतो त्याचे काय वर्णन करावे?काही गोष्टी बाह्ररुपाने सुंदर दिसतात पण आतील गुणांनी ते कुरूप असतात  व माणूस वरच्या रंगाला भुलतो व हळूहळू त्याचे लक्ष वरच्या रंगावरुन उडते व आतील गुणांकडे जाते मग त्याच्या ...

पीठ व शरीर

पीठ आणि शरीर आपल्या घरी बाजरीचे गव्हाचे तांदळाचे पीठ असते .जेव्हा आपण भाकरी करतो तेव्हा जर पीठ व्यवस्थित मळले गेले नाही तर भाकरी व्यवस्थित होत नाही .बर्‍याच वेळा भाकरी काठांना फाटतात किंवा फुगत नाहीत त्याचे कारण म्हणजे पीठाची योग्य मळणी झालेली नसते .जास्त कडक नाही की एकदम मऊ नाही अशा पद्धतीने पीठ मळले की मग त्या भाकरीला  एकदम गोल आकार देता येतो ते ही जास्त कष्ट न घेता किंवा चपातीही गोल होतात काठ न फाटता म्हणजेच पीठाला लवचिकपणा आला की मग हवा तसा आकार देता येतो       त्याचप्रमाणे आपले शरीरही लवचिक असले की मग कोणताही त्रास होत नाही .काहींना बसता येत नाही मांडी घालून कारण पाठ दुखते कंबर दुखते गुडघे दुखतात .आपल्या शरीरात अनेक सांधे आहेत .उठल्यावर प्रथम सांध्याचा व्यायाम करावा .सांध्यांमध्ये लवचिकपणा यायला हवा मग बोटाचे असतील पायाचे असतील हाताचे असतील कमरेचे असतील मानेचे असतील .असे सगळे सांधे व्यायाम योगाने मोकळे करावे म्हणजे त्यात लवचिकपणा येईल म्हणजे बसतांना उठतांना त्रास होणार नाही .अनेक आसनांचा सराव करून ते आसने यायला हवेत .बर्‍याच जणांना पदमासनात वज्रासनात बसता य...

खेळ मांडला

मांडिला खेळ का रे मांडिला हा संसाराचा खेळ सुख आणि दु:ख त्यात भरून धावतात लोक सदा काळी नाही मिळत कुठे समाधान श्रीमंत गरीबात मुले येतात जन्माला कोणते पाप पुण्य असते त्यांच्या गाठीशी कुणालाच नाही उमगले हे कोडे तू असतो का रे सगळ्यांच्या पाठीशी कुणाला किती आयुष्य हे फक्त असते तुलाच माहीत आयुष्याची दोरी आहे रे तुझ्या हाती माणूस  जगतो मात्र अज्ञानात गरीब श्रीमंत थोर लहान असा नाही करत तू भेदाभेद ज्याचे भरले पारडे जीवनी त्याला उचलतो अलगद गरीब होतो श्रीमंत श्रीमंत होतो कधी गरीब सत्य तूचं जाणतो नक्की काय आहे ती बाब तुला निंदा अथवा वंदा करतो सगळ्यांना एकच न्याय कर्मा प्रमाणे देतो फळ नाही करत कुणावर अन्याय हा खेळ खेळता खेळता दमला असशील रे तू देवा कशाला तरी मांडला हा खेळ शेवटी आहे हा सारा देखावा कारण तरी सांग मला का रचला हा संसार शेवटी बाकी सगळ्यांची शून्य कुणी कितीही असेल शेर उपजे ते नासे ,नासे ते उपजे हा केला तू नियम तयार स्वत: अविनाशी राहून लोकांच्या माथी मारला हा भवसागर   कितीही यंत्राचा शोध लावून माणसांच्या बुध्दीने तू नाही गवसला संताना आहे  माहीत तू भावाचा  रे भूकेला प्रा. द...

गोंधळ

गोंधळ माणसाच्या मनात तीन मार्गानी गोंधळ घुसतो व त्या गोंधळांमुळेच माणूस मनशांती हरवून बसतो.पहिला मार्ग गोंधळ शिरण्याचा म्हणजे आपले कान.कानाद्वारे आपण ऐकतो .विविध प्रकारचे आवाज कानाद्वारे आपल्यात घुसतात मग चांगले आवाज मनाला आनंद देतात तर काही आवाज मनाला क्लेश देतात. आपली इच्छा नसतांनाही काही आवाज कानावर पडतात व मग त्या आवाजाने मनात गोंधळ सुरु होतो .दुसरा मार्ग गोंधळ घुसण्याचा म्हणजे आपले तोंड.गरज नसतांना काहीजण फालतूक बडबड करत असतात .छोट्या कारणांनी शिवीगाळ करतात व नको ते शब्द तोंडानी उच्चारले जातात .त्या शब्दांचा दुसर्‍याला त्रास होतोच पण स्वत:च्या मनालाही खूप होतो व मनात गोंधळाची स्थिती निर्माण होते  .तिसरा गोंधळ म्हणजे न ऐकताही व न बोलताही आपल्या मनात  गोंधळ चालू असतो .आपण आपल्याशी बोलत असतो विचाराने .हे असे झाले ते तसे झाले .हा असा का बोलला मग मी ही उत्तर देईन. त्याचा बदला घेईन असे नाना प्रकारे आपण विचार करुन स्वत:शीच बोलत असतो व अशा बोलण्याने मनात गोंधळ निर्माण होतो .जेव्हा हे तिनही गोंधळ बंद होतील तेव्हाच मन एकाग्र होईल व जेव्हा  हे तिनही आवाज ऐकण्याचे थांबेल तेव्हा ...

तीन अवस्

तीन अवस्था सकाळ म्हणजे जणू एक प्रकारचे असते बालपण शुद्ध विचार शुद्ध आचार उत्साही राहते मन सकाळच्या वेळी मनात येते चिंतन करावे देवाचे बालपणीही आवडतात देवाच्या गोष्टी तेच क्षण असतात संस्कार करण्याचे दुपार समजावी जणू तारूण्याचा काळ मन नसते कधी जागेवर धावत असते न बघता वेळ दुपारी अनेक विचार  घालतात थैमान तारुण्यातही अनेक विचारांनी मन होते बेभान तिसर्‍या प्रहरी लागते चाहूल म्हातारपणाची केस पांढरे चेहर्‍यावर सुरकुत्या चिंता वाढते आरोग्याची तिसर्‍या प्रहरी कामात येते थोडीशी शितलता तसचं होते त्या वयात शरीरात जाणवते  कमतरता संध्याकाळ असतो जणू म्हातारपणाचा काळ सांगता येत नाही जीवनाचे कधी काय होईल संध्याकाळी विचार असतो दिवसभर काय केल्याचा म्हातारपणीही असतोच तोच विचार तरूणपणी काय काम केल्याचा गाढ झोप ज्याची लागते रात्री लक्षण आहे दिवसभर चांगले काम केल्याचे मरणही ज्याला येते शांत जीवनभर चांगले कर्म ज्याचे असावा सर्वकाळी उत्साह सदा आपल्या जवळी त्याने होतील चांगले कामं समाजाचे होईल त्यामुळे भले वेळोवेळी प्रा.दगा देवरे

प्

प्रवास आपला जन्म होण्याआधीच  सुरु होतो प्रवास इच्छा नसतांनाही आपली होतो मात्र त्याचा त्रास सतत करत असतो प्रवास काहीतरी साध्य करण्यासाठी ते मिळेलच आपल्याला याची नसते कोणती गॅरंटी काही प्रवास ठरवून पण क्षणात तो बदलतो कधी कुठे करावा लागेल प्रवास हे येणारा काळच ठरवतो प्रवास म्हणजे फिरणे नसून काहीतरी त्याच्यातून शिकावे नसावा तो वेळ काढूपणा चांगले घेऊन तसे वागावे जन्म मरणाचा प्रवास लागला आहे सगळ्यांच्या पाठी त्यातून कुणीच नाही सुटत हे आहे प्रत्येकाच्या ओठी प्रवासासाठी हवी चांगली सोबत ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी भरकटवणारे अनेक भेटतात आपली वाट चुकवण्यासाठी जीवनाचा प्रवास होतो चांगला आयुष्याच्या चांगल्या जोडीदाराबरोबर काहींचा प्रवास थांबवतो अयोग्य असा जोडीदार संताच्या बरोबर होतो प्रवास हा आनंदाचा देवाच्या भजनात लागतो थांग हा मनाचा एकांतात बसूनही करता येतो आपल्या मनासारखा प्रवास आतून मनाला पळवावे लागते त्यासाठी एकाग्रता लागते खास कधी प्रवास थांबेल याची नसते कोणती शाश्वती त्याच्याआधीच करावा प्रवास जन्म मरणाची थांबवावी आपत्ती काहींना नसते दिशा कुठे प्रवास करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाया घालवतात व...

बदल

बदल दिवस बदलतात महिने बदलतात वर्ष ही शेवटी बदलते सवयी कायम ठेवून शरीरही आपले बदलते तोच राग तोच द्वेष मनाच्या असतो गाभार्‍यात त्यांची तीव्रता कमी न करता रोजच जातो वाढत तेच बोलणे तेच न हसणे समोरच्याला बघून मान तिरपी करणे तेच काम तसेच चालणे अपेक्षा धरावी दुसर्‍याने बदलणे केस पिकतात दात पडतात शरीर शेवटी थकते सवय नेहमीची आपली दुसर्‍याला दोषी ठरवते याला ओळखले त्याला ओळखले स्वत:ला मात्र सोडून राग असतो कायम नाकावर निमित्त पाहिजे फक्त समोरून बालपण गेले डोळ्यासमोरून तारूण्यही आले सरत म्हातारपणाचे दिसायला लागले लक्षणे काहीच बदल नाही वागण्यात रस्त्यावरचे खाणे काहीतरी पिणे पोटाचा कोणताही विचार नसणे जायची यायची नसते कोणती वेळ कायम शिस्तीत न वागणे माणसा माणसा जागा हो आयुष्य चालले संपून बदल करावा आपल्यात स्वत:ला पुरेपूर ओळखून आज नको उद्या करू बदल करता करता दिवस चालले भराभर भिंतीवरचे कॅलेंडर बदलून माणूस बनायचे राहिले दूर प्रा. दगा देवरे