Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

विचार

विचार विचार  हे मनाचे खाद्य आहे जसे विचार मनाला पुरवणार तसे मन बनते .एकातांत असतांना मनात विचारांचे काहूर माजते ते विचार बहुत करुन विकारांना जन्म देतात.आपल्या मनात विकार निर्माण करणारे विचार जास्त येत असतात व त्यावर जर मात केली नाही तर ते आपल्याला अधोगतीला नेतात जसे पाणी नेहमी उतार्‍याकडेच धावते व चढत्या बाजूला न्यायचे असेल पाणी तर मात्र मोटर इंजिनचा वापर करावा लागतो म्हणजे साधनांचा वापर केल्यानेच पाणी चढत्याकडे जाते पण  साधनांचा वापर न  करता पाणी सहजच उतार्‍याकडे धाव घेते त्याचप्रमाणे विकारांकडे धाव घेतांना मनात कोणतेही कष्ट न करता विचार येतात व त्यावर दाबा ठेवणे फार अवघड असते जर दाबा ठेवण्याची कला नसेल तर ते विचारआपल्याला रसातळाला नेतात पण  बिनविकारी बनायचे असेल तर तो चढता मार्ग आहे सहजा सहजी बनने अशक्य असते तेव्हा संतानी साधनांचा वापर सांगितला आहे त्या साधनांचा वापर केला तर विकारी विचारांना थांबवता येते .जेव्हा विकारी विचार येतात तेव्हा थोडे मन शांत करण्याचा प्रयत्न करावा जसे मन शांत करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा ते अधिकाधिक विकारी विचार  मनात येतात व मन बंड ...

उठा आता वेगू करा

उठा आता वेगू करा नका करू आळस नका करू कंटाळा उठा आता वेगू करा अवघे जन सकळा सोडा वाईट व्यसने नाही दिवस आता उरले चालला आहे एक एक दिवस खूप आयुष्य वाया गेले काळ खातो एक एक दिवस म्हणून सावध व्हरे आता व्हा जागे  तुम्ही झोपेतून करा चांगले काम येता जाता जे जे ठावे ते टाकावे देऊन हिच करावी मानवसेवा स्वत:चाच विचार करून नुसते खात बसू नये मेवा लागतो  एक क्षण श्वास बंद व्हायला त्याआधी व्हारे सावध आपले हित साधायला योग प्राणायाम आहे जीवनाचा मुख्य गाभा नका करू दुर्लक्ष नाहीतर करा तोबा तोबा आयुष्य आहे सिमित नका घालवू वाया आता तरी व्हारे जागे उरेल एक दिवशी फक्त काया भरपूर आहे आयुष्य हा आहे एक भ्रम वर्ष सरतात भराभर जवळ येत असतो मुक्काम करू या भजन विठ्ठल विठ्ठल भरेल आत  भरपूर उर्जाश्रश्रश्रफ होतील कामं चांगले अन् वाढेल आपला दर्जा प्रा. दगाजी देवरे

झोप

झोप झोप आहे देवाने दिलेली देणगी प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी सुख दु:खापासुन करते ती सुटका आपल्याला कुशीत घेणारी श्रीमंत गरीब नसतो तिच्यात भेदभाव जात धर्म देश ठिकाण ती नाही बघत पशू पक्षी किटक यांनाही कवेत घेऊन शांती देते त्यांना झोपेत सत्ता पैसा कमी जास्त असला तरी लोक जगतात पुरेशी  झोप नसली तर माणसाचे  मन नाही लागत झोपेमुळे होतो माणूस ताजातवाना दैनंदिन काम करण्यासाठी झोपेसारखे नाही कोणते औषध माणसाला उर्जा मिळविण्यासाठी आयुष्याचा अंत जेव्हा होतो तेव्हा म्हणतात त्याला गाढ झोप कुणीच मोडू शकत नाही असते ती चिरंतन झोप झोपेमध्ये माणूस विसरतो स्वत:ला आणि जगाला शांतीच्या महासागरात डुंबून जागे झाल्यावर उर्जा मिळते त्याला झोपेसारखे साधन नाही  कोणत्याही जगात नियतीने फुकट बहाल केले म्हणून शांती नांदते आत काहींना भेटत नाही झोप ते घेतात गोळ्या झोपेच्या झोप नेहमी हजर असते दारी प्रामाणिक कष्टकर्‍यांच्या झोपेमुळे माणूस विसरतो स्वत:ला श्रीमंत आणि गरीब झोप घेते सगळ्यांना मिठीत चालत नाही तिच्यापुढे कुणाचा रुबाब दिवसभर प्रामाणिकपणा ठेऊन रात्री झोप लागते शांत काही चुकीचेे काम झाले तर झोप कधीच ना...

ओझं

न दिसणारं ओझं एक वेळ शरीरावर असलेले ओझं आपल्याला उतरविता येते पण मनावर असलेले न दिसणारे ओझे मात्र उतरविणे फार अवघड असते .ते दिसत नाही पण जाणवत राहते मग कुणी आपल्यावर उपकार केले असतील व आपण त्याची जाणीव ठेवली नसेल याची खंत मनावर असणे किंवा आपली संपत्तीवरुन किंवा पैशावरुन कुणी केलेली फसवणूक असेल तसेच कुणीतरी आपला अपमान केला असेल .आपला विश्वासघात झालेला असेल .आपल्याकडुन काहीतरी चूक झाली असेल व ती आपण दडवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल.आपल्याला काहीतरी करायचे होते पण भलतेच झाले .आपण मनात ठेवलेली स्वप्नं धुळीला मिळाली असेल .आपली प्रिय व्यक्ती आपल्याला कायमची सोडून गेली असेल व तिच्या किंवा त्याच्या आठवणी त्रास देत असतील अशा अनेक गोष्टी आपल्या मनात घर करुन बसतात व वेळोवेळी डोकं वर काढतात .आपल्या मनावर ओझे बनुन राहतात व त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो आपल्याला शांत वाटत नाही .जास्तच विचार करत बसलो तर हार्टवर त्याचा परिणाम होतो व आजार सुरु होतात ,blood pressure  सुरु होतो .मनावरील त्या ओझ्यामुळे अनेक शरिराच्या तक्रारी सुरु होतात तेव्हा त्या गोष्टी हळुहळु मनातून काढून टाकल्या पाहिजेत सकारात्मक...

इचाछा

इच्छा तिथे मार्ग दिसे आपल्या मनात सकारात्मक व नकारात्मक विचार सतत येत असतात.ज्या विचारांची तीव्रता जास्त असते ते विचार आपल्या मनावर राज्य करतात आणि जसे विचार तस मन बनते वएकदा मनात विचार आलेत की त्यांची frequency वातावरणातील frequency शी जोडली जाते त्यामुळे वाईट विचार असतील मनात तर वातावरणातील वाईट विचारांशी मेळ होतो व तसे माणसे  तशी परिस्थिती भेटते.समजा एखाद्याला दारू सिगारेट बीडी तंबाखू खाण्याची किंवा पिण्याची इच्छा झाली तेव्हा त्या प्रकारचे लोक त्यांना भेटतात.एखादा अध्यात्म मार्गावर चालत असेल तर त्याला त्या मार्गावर प्रवृत्त करण्यासाठी असलेले मार्ग येऊन मिळतात जसे मोबाईलवर नंबर dial केल्यावर त्या नंबरशी frequency जोडली जाते व समोरचा मोबाईल वाजू लागतो त्याचप्रमाने आपण केलेली इच्छा तीव्र असेल तर त्या इच्छेप्रमाणे   असलेले माणसे भेटतात म्हणून वातावरणात सर्व available आहे जसा आपण विचार करणार तसे जुळुन येते त्यामुळे दारुड्या माणसाला दारूड्या भेटतो .वारकर्‍यांना वारकरी भेटतात.व्यापार्‍यांना व्यापारी भेटतात त्यामुळे मनात चांगले विचार आणले तर चांगली माणसे भेटतात.मनात विचार येणे...

देव एकचि

देव एकचि कुणी बोलावे कृष्ण कुणी बोलावे राम कुणी बोलावे अल्ला कुणी बोलावे रहिम देव तो आहे एकचि कुणी बोलावे येशू कुणी बोलावे महावीर कुणी बोलावे शिव कुणी बोलावे पैगंबर देव तो भरला एकचि कुणी बोलावे कबिर कुणी बोलावे ज्ञानोबा कुणी बोलावे महामुनी कुणी बोलावे तुकोबा देव तो आहे एकचि कुणी बोलावे संत मीराबाई कुणी बोलावे संत जनाबाई कुणी बोलावे संत कानोपात्रा कुणी बोलावे संत मुक्ताई देव तो आहे एकचि कुणी बोलावे भगवान बुद्ध कुणी बोलावे भगवान वामन कुणी बोलावे भगवान परशुराम कुणी बोलावे भगवान गजानन देव तो आहे एकचि कुणी घ्यावे नाम कुणी करावे तप कुणी करावा नमाज कुणी करावा जप देव भेटेल एकचि कुणी जावे चर्चमध्ये कुणी जावे मंदिरात कुणी जावे जैन मंदिरी कुणी जावे मस्जिदीत देव आहे तेथे एकचि कुणाचा धर्म हिंदू कुणाचा धर्म जैन कुणाच धर्म इस्लाम कुणाचा धर्म ख्रिश्चन देव आहे सगळ्यांमध्ये एकचि प्रा. दगा देवरे

आवराआवर

70 वर्ष वयानंतर आवराआवर माणसाचे आयुष्य सरासरी 90 पकडले तर वयाच्या 70 नंतर आवराआवर करायला हवी जसे आपण प्रवासाला निघतो तेव्हा त्याचे नियोजन आपले बर्‍याच दिवसापासून चालू असते त्यामुळे गोंधळ उडत नाही .काही जणांचे प्रश्न तसेच शिल्लक राहतात मग ते गेल्यावर तमाशे सूरू होतात .वडिल किंवा आई यांच्या नावावर  असलेल्या संपतीबद्दल भांडणे निर्माण होतात.एक  बोलतो मला ही जमीन नको ती हवी मग हाणामार्‍या कोर्टकचेरी चालू होतात भावा भावांमध्ये शत्रूता निर्माण होते भाऊ बहिणी मधील नाते संपूष्टात येते.पण जर का जीवंत असतांना आपल्या मुलांना बोलवून सामोपचाराने त्यांची वाटणी करून दिली तर तंटे होणार नाहीत व संबंध ही चांगले राहतील म्हणून वयाच्या 70 नंतर या गोष्टी तडीस लावायला हव्यात . राजकारणी लोकांचे 70 वय म्हणजे तरूण  पण मग त्यांनीही देशाची सेवा चांगली करायला हवी त्यांना मिळालेली ती एक संधी असते लोकांची सेवा करण्याची पण काही आपल्या सात पिढ्या  आनंदात जीवन कसे जगतील याची सोय करण्यासाठी धडपड करतात व त्यामुळे आवराआवर त्यांची राहूनच जाते हव्यास सोडून मी उरलो उपकारापूरता अशी भावना निर्माण व्हायला हवी ...

सुख्

सुखाची गंगा जीवनात फिरलो भटकलो दमलो पायपीट करुन सुख शोधत होतो नव्हते थार्‍यावर माझे मन मंदिर मज्यिद चर्च  सगळीकडे सुख शोधले ःशगर्दी गोंगोटाने मन माझे मलिन मात्र झाले तिर्थस्थानी मी फिरलो डोंगरमाथी सर केली नाही गवसले सुख मला शेवटी मनाला मुरड घातली स्वप्नी माझ्या तुझे रुप पाहिले मनशांतीचा अनुभव मिळाला तुझ्या चरणाशी सुखाची गंगा पाहून मला परमानंद झाला तुझ्या चरणाशिवाय नको मला काही दाखवू देवा वाहते सुखाची गंगा चरणाशी मी त्यात डुबकी मारली रे रावा विसरलो सारे संसाराचे दु:ख तुझ्या सुखाच्या गंगेत नको दूर लोटू मला नाही तुझ्याशिवाय चिंतन माझ्या मनात सुखाची गंगा झुळुझुळु  वाहे तुझ्या चरणी आणिक नको काही  मागणे माझ्या मनी संसाराचे ताप गेले वाहून तुझ्या चरणाच्या गंगी आनंदाचे भरते आले देवा माझ्या अंगी तुझ्या चरणाहून आहे संसारातील सुख थोकडे का वाया घातले आयुष्य होऊन ते रोकडे सुखाची गंगा ठेविली तू आपुल्या चरणी असा कसा रे तू देवा  राहतो सगळ्यांच्या अंतकरणी माणूस आहे अज्ञानी शोधतो सुख आपुल्या संसारी शोधता शोधता सुख  लोकं झालीत म्हातारी प्रा. दगा देवरे

ब्रह्

आज मी ब्रह्म पाहिले हिरवा रंग निसर्गात  पुरेपुर देवाने भरला पाहून मी थक्क झालो त्याच्यात मी ब्रह्मं तो पाहिला सागरात खेळते पाणी लाटांरूपी शालू नेसला सागरात मस्त डोलतांना मी ब्रह्मं तो पाहिला आकाश पसरले दुरवर निळा रंग हा त्याने भरला ढगांचे विविध रूपात मी ब्रह्मं तो पाहिला पावसाच्या सरीवर सरीबरोबर ढगांचा गडगडाट ऐकला वीजांच्या त्या लखलखाटात मी ब्रह्मं तो पाहिला पक्षांचा मधूर मधूर आवाज पहाटेच्या प्रहरी आला कोकीळच्या गोड गाण्यात मी ब्रह्मं तो पाहिला लहान लहान बालके घालतो तो जन्माला त्यांच्या निरागस हसण्यात मी ब्रह्मं तो पाहिला आकाशात  ग्रह तार्‍यांचा सडा हा पडला शीतल चांदण्या रात्री मी ब्रह्मं तो पाहिला गाय वासरात प्रेम बघून मायेचा ओलावा आठवला गायीच्या त्या डोळ्यात मी ब्रह्मं तो पाहिला गोरगरीबांची सेवा करण्यात कुणीतरी त्यात रमला त्या व्यक्तीच्या रूपात मी ब्रह्मं तो पाहिला आईवडिलांच्या पुण्यांईने आजपर्यंत मी वाढला त्यांच्या निस्वार्थ ममतेत मी ब्रह्मं तो पाहिला गुरूजनांच्या ज्ञानाने प्रगतीचा शिखर गाठला त्यांच्या त्या व्यक्तीमत्वात  मी ब्रह्मं तो पाहिला मित्रमंडळीने माझ्या जीवनी ...

पितर

पितर पितरांचा करू या सन्मान होते ते आपल्या जीवनाचा भाग दिसली दुनिया त्यांच्यामुळेच होते ते जीवनात वाघ घरदार पैसा अडका  सोडून गेले कायमचे दूर राहिल्या फक्त आठवणी येतात नेहमी डोळ्यांसमोर सगळे जण होणार पितर एक दिवशी त्याची आठवण ठेऊन चांगले काम करावे दर दिवशी करावे पुजन जीवंत माणसाचे ते  पितर होण्याआधी करावा ठेवावा त्यांचा मान दु:ख देऊ नये त्यांना कधी पितरांचे चांगले गुण आणावे आपल्या मती हिच ठरेल त्यांची पुजा त्यासाठी पाहू नये कोणती तिथी जीवंतपणी नाही दिले सुख मृत्यूनंतरची सेवा नाही उपयोगाची जे करावे ते त्यांच्या जीवंतपणी मृत्यूनंतरही बरसात करतील आशिर्वादांची प्रा. दगा देवरे

देव नाही बाजारातला भाजीपाला

देव नाही बाजारातला भाजीपाला बर्‍याच जणांचे मत आहे की जगात देव नाही .जी गोष्ट आपण नाही म्हणतो त्याआधी त्याचा पूर्ण अभ्यांस करावा व मत मांडावे .समजा एखाद्याला गणितातला pg level  चा प्रश्न विचारला की ज्याला साधे वजाबाकी बेरीज माहीत नसते ती व्यक्ती म्हणेल की या जगात गणित वगैरे काही नसते तसे झाले. आपल्या घरात बाप नावाचा माणूस असतो त्याची आपण लेकरे तोच आपला सांभाळ करतो .घरातल्या सर्व गरजा भागवतो त्याच्यामुळेच घर चालते व मग घरातील मुले मोठी झाली की त्यांनी म्हणायचे बाप नावाचा कुणीही नसतो तसे झाले. या जगात आपोआप काहीही होत नसते. आपले घर चालवायला कुणीतरी असतो तरच चालते  मग हे विश्व काय कुणाच्या सत्तेशिवाय चालते काय?एका पर्वताच्या पायथ्याशी मुंगी असते व ती म्हणते  मला जेवढे दिसते  तेच विश्व आहे .पर्वत किती मोठा असेल ? ती तिची कितीही बुद्धी वापरली तरी पर्वत बघू शकत नाही कारण तिच्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या .त्याचप्रमाणे आपली मानवाची बुद्धी पण तेवढीच तोटकी आहे की त्याला आपण बघणे किंवा तो केवढा असेल याची कल्पना करणेही शक्य नाही.त्याचे वर्णन करताना वेदही थकले .ते म्हण...

हवेचा फुगा

हवेचा फुगा व जीवन हवा भरलेला फुगा जिकडे  वारा वाहतो तिकडे जातो.अगदी उंचच उंच आकाशाकडे झेप घेतो आपण कुठुन आलोत याचे भान विसरतो व गर्वाने फुगून स्वत:वरचा दाबा हरवुन बसतो व कुणाकडे न बघता फक्त उंच जातो व सर्व दिशांना भरकटतो मग हवा गरम होते आतील व फुटतो मग जमीनवर आपटतो त्यावेळी त्याच्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही लोक पायाने तुडवतात  आणि त्याचे अस्तित्व संपते तसेच माणसाचे असते जरा काही यश पैसा मान मिळाला की गर्वाने असा काही फूगतो की आजुबाजूला लोक आहेत हे विसरतो आपल्याच धुंदीत जगत असतो ज्या लोकांनी आपल्याला मोठे केले हे ही विसरून जातो अहंकार अभिमान गर्व कधी त्याच्या मनाची जागा घेतात हे ही त्याला कळत नाही मग एक दिवशी असं काही संकट येते की त्याचा पैसा मान सर्व काही निघुन जाते किंवा आलेल्या संकटापुढे पैशाला व पदाला काहीही किंमत उरत नाही किंवा आलेले संकट पैसा किंवा पद दुर करु शकत नाही त्यावेळी तो भानावर येतो पण वेळ निघुन गेलेली असते व पश्चातापाशिवाय हातात काही नसते म्हणून माणसाजवळ पद असो पैसा असो मान असो संपत्ती असो हे सर्व भासमान असते माणसाला भुलवणारे असते त्याचा उपभोग जरूर घ्यावा पण त्य...

राग आणि शांतता

राग आणि शांतता माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत शांतता व राग.जीवनाचे दोन टोक आहेत राग आणि शांतता .एकमेकांपासुन कायम ते लांब असतात . एकमेकांत ते गुंतलेले असतात पण दिसतांना ते टोकाचे वाटतात .राग आणि शांतता एका म्यानात कधीच राहत नाही .एक संपला की दुसर्‍याचा जन्म होतो .राग आणि शांतता दोन्हीही प्रत्येकाच्या शरिरात असतात .त्यांना पोषक वातावरण मिळाले की ते उत्पन्न होतात .राग हा धुळधाण करुन टाकतो .नातेसंबंध हा राग तोडून टाकतो .शरीरात ज्या ज्या वाईट शिव्या , वाईट शब्द असतात ते बाहेर फेकल्याशिवाय म्हणजे समोरच्याला ऐकविल्या राहत नाही.रागाने सदविवेक बुद्धी नाहीशी होते . माणसाच्या संबंधामध्ये मजबूत भिंत हा राग निर्माण करतो त्यामुळे सख्खे नातेवाईक रागामुळे दूर जातात .जे होऊ नये ते रागाने होते .घर तुटण्याला हाच राग कारणीभूत असतो .माणसा माणसातील प्रेम आदरभाव हा राग नष्ट करुन टाकतो.रागाने मारलेले शब्द माणसाच्या मनावर कोरले जातात .झालेली प्रगती राग एका क्षणात धुळीला मिळवतो.त्याउलट शांतता असते .कोणताही  वाईट प्रसंग निर्माण झाला तरी शांतता मनात असली की त्यावर मात करता येते .शांततेने अचूक मार्ग काढत...

थोडा वेळ

थोडा वेळ थोडा वेळ हा जीवनाला कलाटणी देणारा असतो मग तो एक मिनिटापासून पाच मिनिटापर्यंत असू शकतो.बर्‍याच वेळा आपल्या मनाविरूद्ध काही घडले की आपले डोकं फिरते व भावनेच्या भरात आपला पारा एकदम वरच्या थराला जातो व आपल्या हातून नको ते घडते तेव्हा जर त्यावेळी थोडा वेळ जाऊ दिला व शांत मन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या रागाची तीव्रता कमी होईल व आपल्या हातून वाईट होणारी घटना थांबेल.रिक्षा ट्रेन बस यातून प्रवास करतांना बर्‍याच वेळा जागेवरून धक्का मारण्यावरुन भांडणे होतात त्यावेळी थोड्या वेळेचा विचार करावा व शांत राहावे  .पुढे होणारे वाईट परिणाम थांबतील.मित्रमंडळींच्या आग्रहाने आपण एखादी सिगारेट ,गुटखा, तंबाखू, एखादा पेग अजून काही भावनेच्या भरात करायला जातो व तोच क्षण आपल्याला जीवनातून उठवण्याचा ठरतो तेव्हा त्या क्षणाला थोडा समयचा विचार करावा .गावामध्ये आपल्या शेतात कुणाचे गुरे घुसतात किंवा घरात मुके प्राणी घुसतात तेव्हा त्या क्षणाला डोकं फिरते व रागाच्या भरात आपण काय काय करुन बसतो तसेच शेताच्या बांधावरुन भानगडी पाणी भरण्यावरुन तंटे, एखाद्या दिवशी जेवण चांगले न होणे ,घरी उशिरा येणे, खोटे बोलणे,...

तो बघतो आहे

तो बघतो आहे प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रांत काम करत असतो व त्याचा मोबदला आपल्याला एकतर पैशारुपाने मिळत असतो नाहीतर आनंदाच्या स्वरुपात किंवा दु:खाच्या रुपात मिळत असतो .आपण शिक्षक असाल  डाॅक्टर इंजिनिअर किंवा अजून कोणत्या खात्यात असाल त्या ठिकाणी बरेच जण मिटिंगला वेळेवर न जाणे कामाला वेळेत न पोहचणे .कामाला गैरहजर राहूनही कामाला हजर दाखवणे .दिलेले काम प्रामाणिकपणे न करणे किंवा कसे तरी उरकवणे .आपल्या खात्यात अफरातफर करणे .नियम धाब्यावर बसवणे .कामावर शरीररुपाने हजर राहणे पण काम मात्र घरचे करणे .कामाच्या ठिकाणावरुन घरचा कारभार चालवणे अशा असंख्य गोष्टी आहेत कामचुकारपणाच्या.आपल्याला जो कामाचा मोबदला मिळतो तो खरंच आपल्या वाट्याला आलेले काम अगदी प्रामाणिकपणे 100% करण्याचा प्रयत्न केला का? पण बरेच जण म्हणतात कोण बघतो? कुणी बघत नसेल पण तो मात्र बघत असतो व तो म्हणजे नियती व ती वेळ आल्यावर आपल्या कामाचा हिशोब पुरता करते.एक एक आपल्या कामाचा ती हिशोब ठेवते .जर प्रामाणिकपणे काम केले असेल तर ती सुखाच्या राशी प्रदान करते व काम न करताच पैसे घेतले असतील तर मात्र तेवढ्यापुरते चांगले वाटते पण तो फुकटचा पै...

गणरायाचे मनोगत

गणरायाचे मनोगत पाहून गणरायास वाटले आश्चर्य पृथ्वीवरची शांतता बघून ना ढोलताशांचा आवाज ना टाळ मृदुंग किर्तन गर्दी कुठेच दिसत नव्हती माझ्या कोणत्याही ठिकाणी म्हणून मोकळा श्वास  घेत होतो प्रत्येक ठिकाणी सोने नाणी पैशांनी तिजोर्‍या भरल्या नाही माझ्या नावाने राजकारण समाजकारण करताच आले नाही नाच गाण्यांचा मला  व्हायचा नेहमी त्रास यावेळी एकदम शांतता लागली माझ्या मनास मोदक मला खायचे होते भरपूर असे मिळालेच नाही आईला जाऊन सांगीन मोदकावीना पोट भरलेच नाही पाऊस भरपूर मी पाडला निसर्ग केला हिरवागार कोरोनाकडे केली वक्र दृष्टी होईल तो आता हद्दपार बाळगोपाळ भेटले नाही याची खंत वाटते मला नाचायचे होते त्यांच्या बरोबर भीती वाटत होती त्यांना बाहेर पडायला कोट्यवधीची उलाढाल यावर्षी झालीच नाही माझ्या नावावर असलेला व्यापार बघायला मला मिळालाच नाही माझ्या नावाने जमा झालेला पैसा यावर्षी काही दिसला नाही त्या पैशांवर त्यामुळे काहींना  मजा मारताच आली नाही चाललो मी आज माघारी देऊन जातो भरपूर आशिर्वाद पुढच्या वर्षी येईल लवकर घेऊन सारा हा आनंद प्रा. दगा देवरे

लोखंड परीस आणि जीवन

लोखंड ,परीस व मानवी जीवन लोखंड व मानवाची तुलना केल्यास दोघांमध्ये काहीच फरक नाही कारण लोखंडाची झिज होऊन एक दिवस ते मातीत मिसळून जाते तसेच माणसाचे आयुष्य हे कमी कमी होत जाऊन ते ही मातीत एक दिवस राखेच्या रुपाने मिसळते पण जर लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला तर त्याचे सोने होते व ते सोने मातीत जरी कितीही वर्ष राहिले तर ते तसेच राहते त्याची चमक कमी होत नाही .मातीत ,चिखलात, अग्नीत सोने राहिले तर ते चकाकुन उठते .लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला म्हणून त्याला ही अवस्था प्राप्त झाली .जर त्याला परिसाचा स्पर्श झाला नसता तर मात्र ते लोखंड मातीत झिजुन नष्ट झाले असते तसेच माणसाचे आहे जोपर्यंत माणसाला परिसासारखा सदगुरु लाभत नाही तो पर्यंत माणसाचे जीवन वाया जात असते .पण एकदा का सदगुरु भेटला व त्याच्या ज्ञानाचा आपल्याला स्पर्श झाला की मग आपण कोणत्याही क्षेत्रात असो किंवा कोणत्याही ठिकाणी असो किंवा कोणत्याही मित्रांच्या संगतीत असो आपल्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही .सोन्यासारखे आपले जीवन सदगुरुंच्या ज्ञानाने उजळून निघते मग सदगुरु माणसाच्या रुपात असेल किंवा ग्रंथांच्या रुपात असेल .समाजातील वाईट प्रवृत्तीचा,...