शंकरजी व माता पार्वतीच्या श्रीगणेशाला सूचना जा गणेश बघत आहेत लोकं तुझी वाट कर त्यांच्या पूर्ण इच्छा निवारून त्यांचे संकट ढोल ताशांचा होईल तुला फार त्रास पण लोकांची भावना समजून फक्त शांत बस आचरट गाण्यांनी तुझे कान नको येऊ दे राग कर फार मोठे तुझे मन तुझ्या नावाने भरपूर पैसा सोने टाकतील पेटीत कारण जेथे तू असशील तेथे येते लक्ष्नी धावत दे सगळ्यांना आनंद कर कृपा सगळ्यांवर तुचं आहे त्यांचा आशेचा किरण दे सर्वांना चांगला वर गर्दीचा तुला येईल रोजच फार कंटाळा सहन कर हे सर्व कारण तू आहे त्यांचा गोपाळा मोदक भरपूर खात जा भक्तांचा प्रसाद स्विकार कर सुख शांतीची बरसात होऊ दे लोकांना दाखवं प्रगतीचे शिखर लोक थकून गेलेत पावसाची वाट बघून कर बरसात सगळीकडे मिळेल पिकांना जीवनदान दहा दिवसानंतर सुखरूप ये आम्ही बघत आहोत तुझी वाट तुझ्याविना नाही करमत घेऊन ये भक्तीचे ताट प्रा. दगाजी देवरे